ETV Bharat / state

हात झटकण्यात तिनही पक्ष तरबेज! आता तरी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी - फडणवीस

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. या पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते थेट बांधावर जाऊन करत आहेत. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मदत देण्यावरून कलगीतुरा रंगला आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी, हात झटकण्यात महाविकास आघाडीतील तिनही पक्ष तरबेज असल्याचा आरोप केला आहे.

Devendra Fadnavis Flood Affected Inspection Tour : Devendra Fadnavis criticized to mahavikas adhadi goverment in osmanabad
हात झटकण्यात तिनही पक्ष तरबेज, आता तरी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी - फडणवीस
author img

By

Published : Oct 20, 2020, 10:26 AM IST

Updated : Oct 20, 2020, 11:54 AM IST

उस्मानाबाद - परतीच्या पावसाने महाराष्ट्रात हाहाकार माजवला. या पावसात शेतीचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते थेट बांधावर जाऊन करत आहेत. या दौऱ्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मदत देण्यावरून कलगीतुरा रंगला आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. सरकार पक्षामधील तिनही पक्षात अनेक गोष्टी वरून वाद आहेत. मात्र एका गोष्टीमध्ये या तिघांचेही एकमत असते. ते म्हणजे हात झटकणे... हात झटकण्यात हे तिनही पक्ष तरबेज असल्याची टीका फडणवीस यांनी केली आहे. काही झाले की हे तिघे ही केंद्राकडे बोट दाखवतात असा आरोपही त्यांनी केला. काही करा पण पदरमोड करून पहिले शेतकऱ्याला मदत करा, मुख्यमंत्र्यांनी आता तरी संवेदनशीलता दाखवावी, असे ही ते म्हणाले. फडणवीस उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सोमवारी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. पण अद्याप त्यांनी आश्वासनाशिवाय कोणताही मदत जाहीर केलेली नाही. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष सोमवारी मराठवाडा दौऱ्यावर होते. त्यांनी देखील शेतकऱ्याशी संवाद साधला. आज देवेंद्र फडणवीस उस्मानाबाद येथे पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले आहेत. या दौऱ्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर टीका केली.

देवेंद्र फडणवीस बोलताना....

राज्य सरकारने कर्ज घ्यावं -

सोमवारी केंद्राच्या मदतीची अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, इच्छा शक्ती असेल तर शेतकऱ्यांना मदत करता येवू शकते. केंद्राने मार्च पर्यंतची जीएसटीची रक्कम राज्याला दिलेली आहे. यातून मदत करता येऊ शकते. तसेच शरद पवार यांनी कर्ज काढण्याचा सल्ला दिला आहे. तो योग्य आहे. कारण राज्याची कर्ज काढण्याची मर्यादा १ लाख २० हजार कोटींची आहे. महाराष्ट्राने आतापर्यंत ६० हजार कोटींचेच कर्ज घेतलं आहे.

तिनही पक्ष हात झटकण्यात तरबेज -

राज्य सरकार म्हणत आहे की, केंद्राने मदत द्यावी. केंद्र तर मदत करेलच. पण राज्य सरकार काय करणार हे पहिले सांगितले पाहिजे. राज्य सरकारने पदरचा पैसा खर्च करून शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. पण हात झटकण्यात तिनही पक्ष तरबेज आहेत. केंद्रा विरोधात ते एक सुरात बोलतात, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

कारणे नको -

दर ३ महिन्यांने जीएसीटीत कमतरता येईल, ते केंद्र भरून देणार आहे. केंद्रीय कराचा हिस्सा ही आपल्याला मिळतो. त्यातूनही राज्याला हिस्सा मिळेल. राज्य सरकारला १० ते २० हजार कोटी उभे करणे कर्जाच्या माध्यमातून शक्य आहे. पण तुम्ही फक्त कारणं सांगू नका, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी -

तुम्ही राजकीय बोलाल तर मी ही राजकीय बोलेन, मला राजकारणात रस नाही, शेतकऱ्याला ही नाही, असे सांगत त्यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलता दाखवावी. तुमची जबाबदारी मोठी असल्याचेही त्यांनी सांगितलं.

शरद पवार राज्य सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याचे काम करत आहेत. ती जबाबदारी त्यांनी घेतली आहे. सध्या ते सरकारला डिफेंड करत आहेत, असा आरोप देखील फडणवीस यांनी केला. यावेळी फडणवीस यांनी, शिवसेना-राष्ट्रवादीने पुर्वी केलेल्या मदतीच्या मागण्यांचे व्हिडीओ देखील दाखवले. केंद्राकडे जास्तीत जास्त मदतीसाठी विनंती केली असून ती मदत केंद्राकडून मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितलं.

Last Updated : Oct 20, 2020, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.