उस्मानाबाद : कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. उमरगा तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे ही वाढती संख्या लक्षात घेऊन उमरगा शहरात एक मंगल कार्यालयात कोविड सेंटर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कार्यालयामध्ये तब्बल शंभर खाटांची व्यवस्था करण्यात येत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. उस्मानाबाद तालुक्याच्या खालोखाल उमरगा तालुक्याचा नंबर लागतो. आज(शुक्रवार) दुपारी 1 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 27 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून फक्त उमरगा तालुक्यामध्ये 516 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेकडून शहरातील मीनाक्षी मंगल कार्यालयात 100 खाटांचे प्रशस्त सेंटर उभारण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यातील रुग्णांना खाटाअभावी होणारी गैरसोय थांबण्यास मदत होणार आहे.