ETV Bharat / state

ई टीव्ही स्पेशल : स्वॅब टेस्टींगसाठी उस्मानाबाद झाले 'आत्मनिर्भर'! - उस्मानाबाद कोरोना न्यूज

विशेष म्हणजे, ही संपूर्ण लॅब लोकसहभागातून उभारण्यात आली आहे. आज येथील कोविड 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआर म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरच्यावतीने मान्यता देण्यात आली आहे.

swab testing lab
स्वॅब टेस्टींग
author img

By

Published : Jul 22, 2020, 3:09 PM IST

Updated : Jul 22, 2020, 3:36 PM IST

उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात स्वॅब टेस्टींगची लॅब लवकरात लवकर सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यामुळे आता उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या कोविड 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआरने मान्यता दिली आहे. आजपासून या लॅबमध्ये स्वॅब टेस्टींगचे काम सुरू होत आहे.

कोरोना स्वॅब टेस्टींग लॅबमध्ये कसे चालते काम...पाहा विशेष रिपोर्ट

उस्मानाबाद येथे उभारण्यात आलेली ही लॅब महाराष्ट्रातील तिसरी नॉन मेडिकल लॅब आहे. तत्पूर्वी उस्मानाबादच्या रुग्णांना आणि रुग्णालयाला स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्टसाठी साधारणपणे दोन दिवस वाट पहावी लागत होती. सोलापूर, लातूर आणि अंबाजोगाई येथे स्वॅब पाठवण्यात येत होते. मात्र, या शेजारील जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तेथील स्थनिक लॅबवर ताण पडत होता. त्यामुळे उस्मानाबादला आत्मनिर्भर होण्याची गरज होती. यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आहे. येथेच सुसज्ज अशी प्रयोगशाळाही आहे.

विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने येथील उपकेंद्रात सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन कोविड 19 टेस्टींग लॅब उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण लॅब लोकसहभागातून उभारण्यात आली आहे. आज येथील कोविड 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआर म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरच्यावतीने मान्यता देण्यात आली आहे.

Last Updated : Jul 22, 2020, 3:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.