उस्मानाबाद - लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रासह देशात अनेक भागात बालविवाह मोठ्या प्रमाणात झाले. असाच एक विवाह हा उस्मानाबाद येथेही एक विवाह झाला होता. या बालविवाहाने त्या अल्पवयीन मुलीवर लग्नानंतरच्या काही दिवसातच भयावह पद्धतीने मृत्यू ओढावला आहे. याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी आई-वडीलांसह आठ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रस्तूतीनंतर गमवला जीव -
उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर अणदूर येथील अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद तालुक्यातील उत्तमी कायापूर येथील अजीत बोंदर या 28 वर्षीय तरूणाशी 15 व्या वर्षी करण्यात आला होता. वर्षभरातच सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. त्या मुलीला 7 ऑक्टोबर रोजी बाळंतपणासाठी उस्मानाबाद जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिच्यातील अशक्तपणामुळे तिला सोलापूरला हलवण्यात आले होते. यादरम्यानच तिला कोरोनाही झाला होता. 14 ऑक्टोबर रोजी तिची सिझेरियन पद्धतीने प्रसूती करण्यात आली होती. प्रस्तूतीनंतर दुसऱ्या दिवशी तिला जीव गमवावा लागला.
आठ जणांवर गुन्हा दाखल -
याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक कायदानुसार ग्रामसेवक देविदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुलीचे वडील भारत घुगे, आई चंद्रकला घुगे, मुलीचे काका लक्ष्मण घुगे, राम घुगे, व पती अजित बोंदर, सासू जनाबाई बोंदर, सासरा धनराज बोंदर आणि मुलीची मावशी सुरेखा बोंदर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - नाशिक : वडिलांनी दिलेल्या चुकीच्या इंजेक्शनमुळे मुलीचा झाला मृत्यू