ETV Bharat / state

शेतकरी आत्महत्या प्रकरणी खासदार ओमराजे निंबाळकरांवर गुन्हा दाखल - तेरणा कारखाना

कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती.

शिवसेनेचे खासदार ओमराजे राजेनिंबाळकर
author img

By

Published : Sep 15, 2019, 11:51 PM IST

Updated : Sep 16, 2019, 8:56 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यातील कसबे तडवळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. या शेतकऱ्याने फसवणूक झाल्याने १२ एप्रिल २०१९ ला गळफास घेवून आत्महत्या केली होती. घटनास्थळी जप्त केलेल्या चिठ्ठीत एका चिट्ठीत त्यांनी आत्महत्येस ओमप्रकाश राजेनिंबाळकर व वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख होता. त्यानुसार पोलिसांनी तब्बल ५ महिने तपास केल्यांनतर ओमराजे राजेनिंबाळकरावर गुन्हा नोंद केला आहे.

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरी शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन चौकशी

तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांची जमीन लिलावात काढली होती. या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी ढवळे यांच्या खिशात २ वेगवेळ्या चिठ्ठ्या सापडल्या. त्यातील एका चिठ्ठीत त्यांनी आत्महत्येस ओमप्रकाश राजेनिंबाळकर व वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख होता. त्यांनतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसात गुन्ह नोंद करण्याची तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तब्बल ५ महिने तपास केल्यांनतर गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा- उस्मानाबाद : शिवसेनेचे उमेदवार राजेनिंबाळकरांनी आर्थिक फसवणूक केली, चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

तर दुसऱ्या चिठ्ठीत १३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखाना बाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र भेट झाली नाही असे सांगत व्यथा मांडल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे लोकसभा उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना मतदान न करण्याचे आवाहन देखील केले होते.

हेही वाचा- दहा दिवसानंतर 'त्या' शेतकऱ्याचा अस्थीकलश उद्धव ठाकरेंना पाठवणार

शेतकरी ढवळेंच्या आत्महत्येचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती. तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणी रविवारी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:शिवसेनेचे खासदार ओमराजे राजेनिंबाळकरावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

उस्मानाबाद- जिल्ह्यातील कसबे तड़वळे या गावातील दिलीप ढवळे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती या शेतकऱ्यांने फसवणूक झाल्याने १२ एप्रिल २०१९ रोजी गळफास घेवून आत्महत्या केली होती. शेतकऱ्यांने आत्महत्या केलेल्या घटनास्थळी जप्त केलेल्या चिट्टीत त्याने तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी २०१० या साली कर्ज घेतले होते मात्र कारखानयाने पैसे न भरल्याने तणावाखाली व दुष्काळामुळे आत्महत्या करीत असल्याचे चिट्टीत नमूद केले होते त्यांनतर त्यांचा पुतण्या राज ढवळे यांनी पोलिसात गुन्ह नोंद करण्याची तक्रार केली होती त्यानुसार पोलिसांनी तब्बल ५ महिने तपस केल्यांनतर गुन्हा नोंद केला आहे.
तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा सहकारी बँकेकडे गहाण ठेवली होती , कारखान्याने कर्ज न भरल्याने बँकेने ढवळे यांच्या जमिन लिलावात काढली होती , या तणावामुळे ढवळे यांनी शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी ढवळे यांच्या खिशात २ वेगवेळ्या चिट्ठ्या सापडल्या त्यातील एका चिट्ठीत त्यांनी आत्महत्येस ओमप्रकाश राजेनिंबाळकर व वसंत दादा बँकेचे चेअरमन विजय दंडनाईक जबाबदार असल्याचा उल्लेख होता तर दुसऱ्या चिट्ठीत १३ शेतकऱ्यांनी तेरणा कारखाना बाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भेट झाली नाही असे सांगत व्यथा मांडल्या आहेत . त्याचबरोबर शिवसेनेचे लोकसभा उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर याना मतदान न करण्याचे आवाहन देखील केले होते. शेतकरी ढवळेचा आत्महत्याच मुद्दा लोकसभा निवडणुकीत चांगलाच गाजला होता , शरद पवार यांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन चौकशी केली होती तर उद्धव ठाकरे यांनी जाहीर भाषणात शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते.या प्रकरणी आज खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहेBody:यात vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Sep 16, 2019, 8:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.