ETV Bharat / state

शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? - अमित शाह - भाजप अध्यक्ष अमित शाह

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका सुरू केला. महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ तुळजापूर येथे सभा घेण्यात आली. यावेळी त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली.

अमित शाह आणि शरद पवार
author img

By

Published : Oct 10, 2019, 9:43 PM IST

उस्मानाबाद - शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त भ्रष्टाचार होत राहिला, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी केला. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत महाराष्ट्राला काय दिले? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ तुळजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले? - अमित शाह

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका सुरू केला. ते म्हणाले, भाजप सत्तेत आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राचा विकास झाला. तसेच, तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आराद्यदैवत असलेल्या या तुळजापूरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. यावेळी दत्ता कुलकर्णी ठाकूर, मिलिंद पाटील, नितीन काळे, उमेदवार रणजितसिंह पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

सभा सुरू होण्यापूर्वी पाऊस -
अमित शाह यांची सभा सुरू होण्यापूर्वी तुळजापूर शहरात पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सभामंडपाबाहेर मोठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांना डोक्यावर खुर्च्या घेऊन आसरा घ्यावा लागला. जवळपास 25 ते 30 हजार भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे आणि वाढलेल्या गर्दीमुळे कार्यकर्त्यांची थोडी तारांबळ उडाली.

Intro:तुळजापुरला जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ बनवणार- अमित शहा

उस्मानाबाद- विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपा अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रभर सभांचा धडाका सुरू केला असून याच अनुषंगाने महायुतीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ अमित शहा आज तुळजापूर येथे आले होते यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर सडकून टीका करत शरद पवारांनी महाराष्ट्राला काय दिले असा प्रश्न केला गेल्या पाच वर्षात भाजपा सत्तेत आल्यानंतर व देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्राचा विकास होण्यास सुरुवात झाली असल्याचे अमित शहा म्हणाले शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त भ्रष्टाचार होत राहिला अशी टीकाही शहा यांनी केली उस्मानाबाद साठी असलेल्या 21 टीएमसी पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार आहे त्याचबरोबर तुळजापूर मध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्यदैवत असलेल्या या तुळजापुरला जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ बनवणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले तुळजापुरला रेल्वे काम सुरू झाले असून आम्ही गेल्या पाच वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी महाराष्ट्राला दिला आहे असे शहा यांनी सांगितले या सभेला दत्ता कुलकर्णी ठाकूर मिलिंद पाटील नितीन काळे उमेदवार रणजितसिंह पाटील यांच्यासह बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते समर्थक उपस्थित होते

सभा सुरू होण्यापूर्वी पाऊस

अमित शहा यांची सभा सुरू होण्यापूर्वी तुळजापूर शहरात पावसाला सुरुवात झाली त्यावेळी सभामंडपा बाहेरही मोठी गर्दी होती अचानक आलेल्या पावसामुळे कार्यकर्त्यांना डोक्यावरती खुर्च्या घेऊन आसरा घ्यावा लागला जवळपास 25 ते 30 हजार भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते त्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे आणि वाढलेल्या गर्दीमुळे कार्यकर्त्यांची थोडी तारांबळ झाली

Body:यात vis व byte आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.