उस्मानाबाद : तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात काल भेंडोळी उत्सव संपन्न (Bhendoli Utsav at Shree Tuljabhavani Mata Temple) झाला. या उत्सवानिमित्त मातेच्या मंदिरातून पेटवलेली भेंडोळीचे दर्शन घेण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरवर्षी दिवाळीतील अमावस्यानिमित्त ही भेंडोळी काढण्यात (Bhendoli Utsav on occasion of Diwali Amavasya)येते. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाऊनमुळे या भेंडोळी उत्सवाला भाविकांना हजर राहता आले नव्हते. यावर्षी निर्बंधमुक्त दिवाळीमुळे भेंडोळीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
भाविक मोठया संख्येने उपस्थित : दिपावलीच्या अमावस्येला काळभैरवाचा भेंडोळी उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. काल रात्री काळभैरव मंदिरातुन ही भेंडोळी तुळजा भवानीच्या मंदिरात आणली गेली. देवी भेट झाल्यानंतर मंदिरात प्रदिक्षणा घातली जाते. नंतर कमान वेस येथे मारुती मंदिरात भेंडोळी विझवली जाते. हा उत्सव पाहण्यासाठी स्थानिक व बाहेरचे भाविक मोठया संख्येने उपस्थित (Bhendoli Utsav at Tuljapur) असतात.
भेंडोळी का काढली जाते : अश्विन आमवस्या म्हणजे कन्या राशीचा सुर्य, जो सर्वात खालच्या दर्जाचा समजला जातो. अमावस्या म्हणजे चंद्राची गैरहजेरी आणि चातुरमासामुळे प्राणशक्ती निस्तेज असते. म्हणजे ज्या दिवशी तिन्ही ज्योती सूर्य चंद्र आणि प्राण सर्वाधीक निस्तेज आहेत, तो दिवस. अशा वेळी उर्जा मिळवण्याचा मार्ग म्हणजे भेंडोळी. अर्थात अग्निक्रीडा. म्हणजे आगीशी खेळुन उर्जा मिळवणे. म्हणुन शास्त्राने धार्मिक अंग देवुन उर्जा मिळवण्याचा हा उत्सव काशी आणि तुळजापुर येथे भक्तांकडुन केला (Bhendoli Utsav) जातो.