उस्मानाबाद - जिल्हा प्रशासन आणि सेतू सुविधेचा करार संपल्यामुळे जिल्ह्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्र बंद पडली आहेत. त्यामुळे नागरिकांना कागदपत्र काढण्यासाठी काही काळ थांबावे लागणार आहे.
सेतू सुविधा केंद्रामध्ये सातबारा उत्पन्नाचा दाखला, वास्तव्य जात प्रमाणपत्रासह इतर अनेक कागदपत्रे काढण्यात येतात. मात्र, मंगळवारपासून ही सर्व कागदपत्रे काढणे बंद झाले आहे. मुळात ऑनलाइन पोर्टल धीम्या गतीने चालत असल्याने सेतू सुविधा केंद्रात तासनतास विद्यार्थ्यांसह शेतकऱ्यांचाही रांगा लागलेल्या असायच्या. मात्र, आता तेही बंद झाल्याने विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना कागदपत्रे काढण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शेतू विभागातून मिळणारी कागदपत्रे
राष्ट्रीयत्व, भुमीहीन प्रमाणपत्र, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, नॉन क्रिमिलियर, सातबारा, आठ 'अ',जेष्ठ नागरिक प्रमाणपत्र, वयाचे प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, ऐपत प्रमाणपत्र यासह अन्य प्रमाणपत्रे सेतू सुविधा केंद्रातून मिळत होती.