दिंडोरी (नाशिक) - दिंडोरी तालुक्यातील आंबेगण फाट्याजवळ झालेल्या अपघातात झालीपाडा येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. राहुल नरेंद्र वाघ असे युवकाचे नाव आहे. मृतव्यक्तीच्या पोटावरुन हातावरून अवजड वाहन गेल्याचे निदर्शनास आले आहे.
नाशिक धरणपूर नॅशनल हायवे वर आंबेगण फाटा येथील ठक्कर बाप्पा आश्रम शाळेजवळ रात्री 11ते 12 च्या सुमारास झार्ली येथून राहुल नरेंद्र वाघ हा (MH15. FH2130) या दुचाकीवर नाशिक कडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी रस्त्यात अनोळखी वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघात झालेला व्यक्ती शाळेजवळ आणि दुचाकी आंबेगण फाट्याजवळ लावलेली आढळली, याबाबत मात्र नातेवाईकच्या मनात घात की अपघात असा संशय निर्माण झाला आहे,
दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती मिळताच पोलीस नाईक बाळकृष्ण पजई, पोलीस हवालदार गायकवाड यांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील तपास दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.