ETV Bharat / state

चावलेला विषारी कोब्रा घेऊनच 'तो' युवक रुग्णालयात दाखल - जिल्हा रुग्णालय

सर्पदंश झालेल्या युवकाने, चावलेल्या सापाची जात ओळखून योग्य उपचार व्हावेत यासाठी जिवंत कोब्रा बरणीत टाकून उपजिल्हा रुग्णालय गाठले.

सर्पदंश झालेला युवक - संतोष शिंदे
author img

By

Published : Jul 24, 2019, 2:26 PM IST

नाशिक - सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाने थेट तो विषारी कोब्राच (नाग) रुग्णालयात आणल्याची घटना चांदवडमध्ये घडली आहे. सर्प दंशानंतर डॉक्टरांना उपचार करणे सोपे जावे, यासाठी त्या युवकाने जिवंत कोब्रा पकडून एका बरणीत घातला आणि चांदवडचे उपजिल्हा रुग्णालय गाठले. संतोष शिंदे असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे. हा सर्व प्रकार पाहून क्षणभर डॉक्टरांनी भुवया उंचावल्या होत्या.

संतोष शिंदे यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमराज दळवी यांनी उपचार केले. मात्र संतोषला जास्त त्रास होऊ लागल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सर्पदंश झालेल्या युवकाने थेट कोब्रा सोबत आणल्याने, रुग्णालय परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Intro:सर्पदंशानंतर युवक थेट "कोब्रा" घेऊन दवाखान्यात दाखल...

Body:सर्पदंशानंतर युवक थेट कोब्रा बरणीत घेऊन दवाखान्यात दाखल झाल्याने डॉक्टरांची भंबेरी उडाली,युवकाला कोब्रा जातीचा साप चावल्या नंतर डॉक्टरां उपचार करणे सोपे जावे ह्यासाठी ह्या युवकानी बरणीत कोब्राला घालून चांदवडच्या उप जिल्हा रुग्णालयात दाखल झाला...

चांदवड शहरातील कोतवाल वस्ती भागात एका घरात कोब्रा निघाल्याची माहिती मिळताच जवळील तेजस हॉटेल मधील कामगार संतोष शिंदे हा युवक तात्काळ येथे पोहचुन त्यानें
फणा काढून उभ्या असलेल्या कोब्राला पकडले, मात्र ह्याच दरम्यान त्याच्या हातावर कोब्रा चावल्याने संतोषने जिवंत कोब्रा बरणीत टाकून थेट उपजिल्हा रुग्णालय गाठले,हे बघून रुग्णालयातील डॉक्टरांना धक्काच बसला,सापाची जात ओळखून योग्य उपचार व्हावेत यासाठी जिवंत साप घेऊन संतोष आलं असल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले...

ह्यावेळी संतोष शिंदे यांच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमराज दळवी यांनी उपचार केले ,मात्र त्यास जास्त त्रास होऊ लागल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले सांगितले..मात्र सर्पदंश झालेल्या युवकाने कोब्रा थेट रुग्णालयात आणल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.