नाशिक - शहरात अत्यंत गलिच्छ पद्धतीने पाणीपुरी बनवली जात असल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. यावर आता विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणीपुरी विक्रेत्यांची तपासणी होऊन घाणेरड्या प्रकारे हा पदार्थ बनवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी नाशिककर महिलांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केली.
हेही वाचा - नाशकात 'डर्टी' पाणीपुरीचा भांडाफोड
नाशिकच्या सातपूर येथील पाणीपुरी विक्रेत्यावर शनिवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाने कारवाई केली. सडलेले बटाटे, रंग मिश्रित पाणी, खराब तेल, दुर्गंधीयुक्त हरबरे वापरुन दिवान सिंग हा पाणीपुरीची विक्री करीत होता. अखेर आज त्याच्यावर कारवाई करून ५ हजारांचा दंड प्रशासनाने ठोठावला. शहरातील पाणीपुरी विक्रेत्यांची आरोग्य विभागासह अन्न व औषध विभागाने संयुक्तरित्या तपासणी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
हेही वाचा - फटाक्यांच्या स्फोटात पंजाबमध्ये 15 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी