ETV Bharat / state

मराठवाड्याच्या 25 दिवसांच्या लढ्याला यश! अखेर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावलं - गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ

Water Release from Darna Dam : मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलंय. हे पाणी मिळावं म्हणून मराठवाड्यातील लोकांनी खूप प्रयत्न केले.

Water Release from Darna Dam
Water Release from Darna Dam
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 25, 2023, 11:58 AM IST

नाशिक Water Release from Darna Dam : नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणात अखेर पाणी सोडण्यात आलंय. यासंदर्भात प्रशासनानं कमालीची गुप्तता बाळगून कुणालाही सुगावा लागू न देता शुक्रवारी रात्री उशिरा नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडलंय. सुरुवातीला 192 क्युसेक वेगानं हे पाणी सोडण्यात आलंय. न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेऊन हे पाणी सोडण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिलीय. नाशिकमधल्या गंगापूर आणि दारणा धरण समुहातून जायकवाडीला 3.143 टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभागानं त्यादृष्टीनं तयारी सुरू केलीय. दारणा धरणातून विसर्ग सुरू झाला असून गंगापूर धरणातून लवकरच पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. त्यामुळं पाण्यावरून नाशिक विरुद्ध मराठवाडा असा सुरू असलेला वाद काही प्रमाणात शमण्याची शक्यता आहे.

नाशिकमधून 3143 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश : महाराष्ट्र जलसंपत्ती नियम नियमन प्राधिकरणाच्या समन्यायी पाणी वाटपाच्या आदेशानुसार दुष्काळी स्थितीत ऊर्ध्व गोदावरीतील धरणातून खालील भागातील धरणांमध्ये अर्थात नाशिक नगर मधील धरणातून जायकवाडीत परिस्थितीनुसार किती पाणी सोडावं याबाबतची नियमावली तयार करण्यात आलीय. याआधारे फेज 2 अनुसार जायकवाडीत 65 टक्के पेक्षा कमी पाणीसाठा असल्यानं नाशिकच्या दारणा धरणातून 2643 दशलक्ष घनफूट आणि गंगापूर धरणातून 500 दशलक्ष घनफूट असं नाशिकमधून 3143 दशक घनफूट पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी त्यास विरोध केला तसंच याबाबत विविध न्यायालयांमध्ये याचिका दाखल झाल्या. शासकीय स्तरावरही तक्रारी आणि निवेदनं देण्यात आली. परंतु, त्यास काहीही यश आलं नाही.

कोर्टाचे स्पष्ट आदेश नाहीत : 31 ऑक्टोबरला गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. परंतु, लोकप्रतिनिधींचा विरोध तसंच न्यायालयातील याचिकेमुळं त्याची अंमलबजावणी झाली नाही. मात्र, कुठल्याही न्यायालयानं पाणी सोडण्यास नकार, स्थगिती किंवा पाणी सोडावं असं काहीही स्पष्ट आदेश दिलेलं नसल्यानं अखेर कार्यकारी संचालकांनी 31 ऑक्टोबरच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश नाशिक जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन वरुन दिले. त्यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा दारणा धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलीय.

हेही वाचा :

  1. पाणीप्रश्न पेटला! जायकवाडीला पाणी सोडल्यास जलसमाधी घेणार; अहमदनगरमधील शेतकरी आक्रमक
  2. मराठवाड्याला ८.५ टीएमसी पाणी सोडा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश; नगर, नाशिकमधील शेतकऱ्यांचा विरोध काय
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.