नाशिक - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या लाक्षणिक उपोषणादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि मराठा आंदोलकांमध्ये तणाव निर्माण झाला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना काही मराठा आंदोलकांनी उलट-सुलट प्रश्न विचारल्याने तणाव निर्माण झाला होता.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मराठा संघटनांनी आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन सुरू असताना या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना आंदोलकांनी उलट-सुलट प्रश्न विचारल्याने या आंदोलनाच्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.
मराठा क्रांती मोर्चातील काही कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले काँग्रेसचे शहराध्यक्ष शरद आहेर, नगरसेवका हेमलता पाटील आणि वत्सला खैरे यांना जाब विचारण्यास सुरवात केली. मात्र आंदोलकांच्या भूमिकेवर संतापलेल्या कांग्रेस पदाधिकाऱ्यांनी आम्ही देखील मराठा समाजाचेच घटक असल्याचे सुनावले, त्यामुळे याठीकाणी तणाव निर्माण झाला होता. जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने हा तणाव निवळला.