ETV Bharat / state

'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेंतर्गत कॅन्सर पीडित रुग्णांना पुस्तकांची भेट - Kusumagraj Pratishthan Granth Tumchya Dari

कुसुमाग्रज प्रतिष्ठान अंतर्गत 'ग्रंथ तुमच्या दारी' या योजनेंतर्गत कॅन्सर पीडितांना वाचनासाठी पुस्तकांची भेट देण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मागील 12 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आता 1 लाखाहून अधिक पुस्तके जोडली गेली आहेत.

Granth Tumchya Dari
ग्रंथ तुमच्या दारी योजना नाशिक
author img

By

Published : Dec 30, 2020, 8:25 PM IST

नाशिक - कुसुमाग्रज प्रतिष्ठान अंतर्गत 'ग्रंथ तुमच्या दारी' या योजनेंतर्गत कॅन्सर पीडितांना वाचनासाठी पुस्तकांची भेट देण्यात आली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने मागील 12 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या योजनेत आता 1 लाखाहून अधिक पुस्तके जोडली गेली आहेत.

माहिती देताना योजनेचे प्रणेते विनायक रानडे आणि डॉ. महेश पडवळ

हेही वाचा - सरपंचपदासाठी २ कोटींची बोली!.. नाशिकचा व्हिडिओ व्हायरल

हळूहळू या योजनेचा विस्तार होत आज कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडे 2 हजारहून अधिक पुस्तक पेट्या, 1 लाख पुस्तके, 35 हजार वाचक, 6 हजार 500 लेखक जोडले गेले असून एकूण 2 कोटी 25 लाख रुपयांची ग्रंथ संपदा तयार झाली आहे. जिथे मराठी शब्द, मराठी भाषा आणि मराठी माणूस आहे, तिथे आमची योजना पोहोचवण्याचे लक्ष असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सांगण्यात आले.

देशा बाहेरही 'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेची घोडदौड

भरतासह देशा बाहेरही या योजनेची घोडदौड सुरू असून ती दुबई, नेदरलँड, टोकीयो, फिनलँड, ऑस्ट्रेलिया, मोरेशियस, सॅनफ्रान्सिसको, सिंगापूर, स्वित्झर्लंड, ओमान, मस्कत, श्रीलंका या देशात पोहोचली आहे.

रुग्ण सेवा ही खरी ईश्वर सेवा

कोरोना काळात डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. म्हणून आम्ही नामको हॉस्पिटलमध्ये 'ग्रंथ तुमच्या दारी' संकल्पना राबवली. यात पुस्तक वाचनातून रुग्णांचे मानसिक संतुलन चांगले राहणार आहे. नामको हॉस्पिटलमध्ये खऱ्या अर्थाने रुग्णांचा विचार केला जात असून यामुळे वैद्यकीय क्षेत्राची प्रतिमा अधिक चांगली होणार असल्याचे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे आणि 'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेचे प्रणेते विनायक रानडे यांनी सांगितले.

पुस्तकांचा प्रवास कसा असतो

'ग्रंथ तुमच्या दारी' योजनेतून वाचकांना एक पुस्तकाची पेटी दिली जाते. प्रत्येक पुस्तकाच्या पेटीत 100 पुस्तके असतात. यात कथा, कादंबरी, विनोद, रहस्यमय आदी पुस्तकांचा समावेश असतो. ही पेटी दर चार महिन्यानंतर कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून बदलली जाते. प्रत्येक पेटीत वेगळी पुस्तके असल्याने वाचकांना नवीन पुस्तके वाचता येतात. 35 वाचकांचा गट आल्यास त्यांना ही पुस्तकाची पेटी देता येऊ शकते, असे विनायक रानडे यांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात दिंडोरी तालुक्यात सात शेळ्या ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.