ETV Bharat / state

Leopard Attack On Farmer: छत्रीमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून वाचले शेतकऱ्याचे प्राण; बिबट्या थेट पडला विहिरीत - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ते गावातील शेतकरी छत्रीमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावला. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट 50 फूट खोल विहिरीत पडल्याची घटना घडली. ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

Leopard Attack On Farmer
बिबट्या
author img

By

Published : Jul 17, 2023, 4:13 PM IST

जखमी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढताना वनविभाग कर्मचारी

नाशिक : सिन्नर तालुक्यातील पास्ते तेथील वसंत आव्हाड हे शेतात गेले होते. यावेळी विहिरीत डोकावत असताना, कपारीला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. तोच वसंत आव्हाड यांनी हातातील छत्री उघडून बचाव करण्याच्या प्रयत्न केला. छत्री उघडताच बिबट्या घाबरला आणि उडी चुकल्याने तो 50 फूट खोल विहिरीत पडला. आव्हाड यांनी शेजारील शेतकऱ्यांना आवाज दिला तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आव्हाड यांना धीर दिला.

वनविभागाच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढले : बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती पसरतात नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. याबाबतची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. त्या अगोदर स्थानिक नागरिक सुनील आव्हाड, संजय आव्हाड, शरद आव्हाड या शेतकऱ्याने दोरखंडाला खाट बांधत विहिरीत सोडली. स्वतःचा बचाव करण्यासाठी बिबट्या या खाटेवर स्वार झाला आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिरीत पिंजरा सोडत बिबट्याला बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महोदरी येथील वनोउद्यानात आणून पोटाला जखम झालेल्या बिबट्यावर उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित बोडके, वनरक्षक गोविंद पंढरे, संजय गीते यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

बिबट्याच्या डरकाळीने परिसरात घबराट : शेतकऱ्यावर हल्ला करण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याने जीवाच्या आकांताने डरकाळ्या सुरू केल्या. पाणी जास्त असल्यामुळे बिबट्याने पाईप व मोटर तरंगण्यासाठी वापरलेल्या वायररोपचा आधार घेतला होता. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी त्यास वाचवण्यासाठी विहिरीत खाट सोडली. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिबट्या लगेच खाटेवर बसला. पोटाला मार लागल्याने बिबट्या आक्रमक झाला होता.

बिबट्याचे हॉटस्पॉट : नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड, त्र्यंबकेश्वर हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होतात. या नद्यांच्या आजुबाजूला ऊसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी आणि प्रजननासाठी ऊसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

अशी घ्यावी काळजी : नाशिक जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र मोठ्या बिबट्यांना लपण्यासाठी चांगली जागा असते. ऊसतोड करताना अनेकदा माणसांवर बिबटे हल्ले करतात. अशात शेतकऱ्यांनी, मजुरांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऊसतोड सुरू असल्यास बाजूला शेकोटी पेटती ठेवावी. ज्यामुळे बिबटे, लांडगे, तरस वन्यप्राणी जवळ येणार नाहीत. अनेकवेळा लहान मुलांवर बिबटे हल्ले करत असल्याचे दिसून आले आहे. अशात पालकांनी काम करताना आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

हेही वाचा:

  1. Leopards Jailed In Nashik: नाशिकमध्ये दोन बिबटे जेरबंद, वन विभागाच्या धाडसाचे कौतुक
  2. तरुणावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या बिबट्याचे रेस्क्यू, पाहा व्हिडिओ
  3. Leopard Attack News: राखणदारी करणाऱ्या कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, मालकाने धाव घेतली अन्... पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.