नाशिक - इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर, एकाला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुडालेले दोघेही तरूण जिंदल पॉलिफिल्म कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मुकणे धरणात दोन कामगारांचा बडून मृत्यू धुलिवंदन निमित्ताने इगतपुरी तालुक्यातील मुकणे धरण परिसरात पर्यटन करण्यासाठी दहा ते पंधरा युवक गेले होते. यावेळी काही जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील तिघे बुडाले. इतर मित्रांनी आरडाओरडा करत आजूबाजूच्या नागरिकांना बोलवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत कमल सिंग खरकसिंग बिष्ट (वय 25) आणि मनोज मोहन चंद्र जोशी (वय 51) दोघेही राहणार उत्तराखंड यांचा मृत्यू झाला. तर, एका तरूणाला वाचवण्यात यश आले आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.
हेही वाचा - नांदेडमध्ये शीख भाविकांच्या हल्ला-महल्ला मिरवणुकीदरम्यान पोलिसांवरच हल्ला; चौघे जखमी