ETV Bharat / state

दुचाकीची म्हशीला धडक; पत्नी जागीच ठार, पती गंभीर जखमी - दुचाकीची म्हैशीला धडक

मनमाड-नांदगाव मार्गावर दुचाकीने म्हैशीला धडक दिल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दाम्पत्यापैकी पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

manmad news
मनमाड न्यूज
author img

By

Published : Oct 23, 2020, 3:33 PM IST

Updated : Oct 23, 2020, 3:42 PM IST

मनमाड (नाशिक) - भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारसायकलने म्हशीला दिलेल्या धडकेत म्हशीसोबत मोटारसायकलवरील दाम्पत्यापैकी पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी झाला आहे. मनमाड-नांदगाव मार्गावरील हिसवळजवळ ही घटना घडली.

दुचाकीची म्हशीला धडक

नाशिक येथून आपल्या माहेरी नांदगावला जाणाऱ्या आशा संजय नवसारे, संजय नवसारे या दाम्पत्याचा मनमाड नजिक असलेल्या हिसवळ येथे अपघात झाला. या अपघातात आशा नवसारे या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर संजय नवसारे हे गंभीर जखमी झाले अपघात घडताच नागरिकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले मात्र फोन करून देखील जवळपास अर्धा ते एक तास 108 रुग्णवाहिका आली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला तर रस्त्याच्याकडेला चरण्यासाठी गाई-म्हशी यासारखे प्राणी बांधले असतात ते अचानकपणे रस्त्यावर येतात यामुळे अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आजचा अपघात देखील तसाच झाला. यामुळे महिलेचा मृत्यू झाला. अपघातानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. तर जखमी असलेल्या संजय यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रस्त्याच्या कडेला गाई म्हशी चरण्यासाठी बांधणे योग्य नसल्याचे अनेकांनी निदर्शनास आणले तरी शेतकरी जनावरे बांधतात यामुळे रस्त्यावर अपघात होत आहेत.

Last Updated : Oct 23, 2020, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.