ETV Bharat / state

Two Drowned In River : नाशिकमधील आरम नदीत बुडून मामा- भाच्याचा मृत्यू - Satana Police Station

नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात ( Satana Tahsil Nashik ) असलेल्या आरम नदीपात्रात बुडून मामा- भाच्याचा दुर्दैवी मृत्यू ( Two Drowned In Aram River Nashik ) झाला आहे. ही घटना १५ मार्च रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. सायंकाळी या दोघांचे मृतदेह सापडले.

आरम नदीत बुडून मामा भाच्याचा मृत्यू
आरम नदीत बुडून मामा भाच्याचा मृत्यू
author img

By

Published : Apr 16, 2022, 5:12 PM IST

नाशिक : नाशिकच्या सटाणा तालुक्यातील ( Satana Tahsil Nashik ) डांगसौंदाणे- केळझर गोपाळ सागर धरणातून पाण्याचे तिसरे आवर्तन सोडण्यात आले आहे. सध्या आरम नदीचे पात्र ऐन उन्हाळ्यात दुथडी भरून वाहत आहे. याच नदीपात्रातील दहिंदुले जवळील सिमेंट बंधाऱ्यावर चाफ्याचे पाडे (देवपूर ) येथील गणेश रामचंद्र जगताप (32) व रोशन देवेंद्र बागुल (18) हे कपडे धुण्यासाठी घरातील महिलेसोबत गेले होते. 15 मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान बंधारे परिसरात अंघोळी साठी गेले असता, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला ( Two Drowned In Aram River Nashik ) आहे.

गावावर शोककळा : दुपारी दोन वाजेच्या दरम्यान दहिंदुले गावाजवळील बंधाऱ्याजवळ मामा गणेश जगताप यांचा मृतदेह स्थानिकांना पाण्यात दिसून आला. तर सायंकाळी उशिरा रोशन बागुल यांचा मृतदेह याच बंधाऱ्याच्या पाण्यात स्थानिकांना सापडला. याबाबत सटाणा पोलिसात ( Satana Police Station ) आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, या घटनेने चाफ्याच्या पाडा या गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेची परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोघेही मामा भाचे स्वाध्याय परिवारातील असल्याने सर्वच गाव शोकसागरात बुडालेले आहे. रात्री उशिरा त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. यातील भाचा रोशन बागुल याने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली होती. याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : धरणाजवळ फिरायला गेलेल्या चार मित्रांपैकी तिघांचा धरणात बुडून मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.