ETV Bharat / state

नाशिक : वऱ्हाडाची पिकअप व्हॅन पुलावरून नदीत कोसळली; दोघांचा मृत्यू - pickup van accident

लग्नसोहळा आटपून घरी येत असताना नांदुरमधमेश्वर जवळील गोदावरी नदीच्या पुलावर वऱहाडाच्या पिकअप गाडीला अपघात झाला. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.

accident
पिकअप व्हॅन पुलावरून नदीत कोसळली
author img

By

Published : Jul 13, 2021, 9:58 PM IST

नाशिक - सिन्नरहून लग्नसोहळा आटपून घरी येत असताना नांदुरमधमेश्वर जवळील गोदावरी नदीच्या पुलावर वऱहाडाच्या पिकअप गाडीला अपघात झाला. समोरून येणाऱ्या तवेरा गाडीने कट मारल्याने पिकअप गाडी नदीत कोसळली. या अपघातात 5 वर्षाची चिमुकली व 50 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर, गाडी चालकासह गाडीतील बारा वऱहाडी महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

चालकासह गाडीतील बारा महिला गंभीर जखमी -

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, जळगाव नेऊरगाव येथील वऱहाडाचा पिकअप गाडी सिन्नरवरून आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान लग्न आटपून घरी येत होती. यावेळी नांदुरमधमेश्वर जवळील गोदावरी नदीच्या पुलावर या पिकअपला समोरून येणाऱ्या तवेरा गाडीने कट मारला. त्यामुळे पिकअपच्या चालकाचा ताबा सुटला व पिकअप नदीत कोसळून भीषण अपघात झाला.

या अपघातात जळगाव नेऊरगाव येथील पाच वर्षाची चिमुकली, तसेच 50 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर गाडी चालकासह गाडीतील बारा वऱहाडी महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गाडीत अडकलेल्या लोकांना पाण्याच्या बाहेर काढले. तसेच जखमींना उपचारासाठी निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच सायखेडा पोलीस घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या मदतीने पिकअप गाडी बाहेर काढण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.