ETV Bharat / state

Delhi Theives Arrested in Nashik : दिल्लीच्या दोघा सराईत गुन्हेगारांना ओझर येथून अटक - Ozar Police Station

दिल्ली स्पेशल क्राइम ब्रँच ( Delhi Special Crime Branch ) आणि ओझर पोलीस स्टेशनच्या ( Ozar Police Station ) गुन्हे शोध पथकाने संयुक्तिक कारवाई केली आहे. या कारवाईत फरिदाबाद येथील दोन सराईत गुन्हेगारांना ओझर येथील एका इमारतीच्या फ्लॅटमधून ताब्यात घेतलं आहे. ( Delhi Thefts Arrested from Nashik ) या दोघांवर दिल्लीच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Two Delhi Theives Arrested in Nashik
दिल्लीच्या दोघा सराईत गुन्हेगारांना ओझर येथून अटक
author img

By

Published : Mar 30, 2022, 7:33 PM IST

नाशिक - दिल्ली स्पेशल क्राइम ब्रँच ( Delhi Special Crime Branch ) आणि ओझर पोलीस स्टेशनच्या ( Ozar Police Station ) गुन्हे शोध पथकाने संयुक्तिक कारवाई केली आहे. या कारवाईत फरिदाबाद येथील दोन सराईत गुन्हेगारांना ओझर येथील एका इमारतीच्या फ्लॅटमधून ताब्यात घेतलं आहे. ( Delhi Theives Arrested in Nashik ) या दोघांवर दिल्लीच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ओझर येथील उषा हॉस्पिटल शेजारील हेवन हाईट्स नावाच्या इमारतीत प्रकाश मोरे यांनी त्यांच्या मालकीचा 10 नंबरचा फ्लॅट वायुसेनेत कार्यरत मनोरंजन शाहू यांनी गेल्या महिन्यात भाडेतत्त्वावर घेतला होता.

दोघा सराईत गुन्हेगारांना ओझर येथून अटक

नाशिक येथे वास्तव्याची माहिती - याच फ्लॅटमध्ये दिल्लीतील सराईत गुन्हेगार टेकचंद खेडी श्रीडालचंद (वय 30) व दयानंद एलियाज डीलर (वय 30) हे भाडेकरी म्हणून राहत होते. या दोघांवर दिल्ली व आसपासच्या पोलीस ठाण्यात खून, दरोडे, खंडणी, विदेशी शस्त्रांचा वापर यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या मागावर दिल्ली पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून मागावर होती. गुप्त माहितीवरुन सराईत गुन्हेगार ओझर येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन दिल्ली पोलिसांच्या स्पेशल क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी ओझर पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल क्राईम ब्रांच आणि ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे, गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव, किशोर अहिरराव, दीपक गुंजाळ आणि राजेंद्र बागुल यांच्या पथकाने या सराईत गुन्हेगारांना छाप टाकून ताब्यात घेतलं.

हेही वाचा - Businessman Murder case: व्यावसायिक हत्याकांड प्रकरण.. अंडरवर्ल्ड गँगस्टर बननांजे राजासह 9 जण दोषी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.