नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीतील उज्वला कंपनी झालेल्या चोरी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. हे दोन्ही आरोपी सातपूर परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या आरोपींनी आणखी काही गुन्हे केल्याची माहिती समोर येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी व्यक्त केली आहे.
पुरावा मिळू नये म्हणून चोरला सीसीटीव्ही कॅमेरा, हार्ड डिस्क -
25 जूनला सातपूर औद्योगिक वसाहतीतील असलेल्या उज्वला भारत लिमिटेडच्या एम. डी. ट्रेडर्समधुन पाच लाख रुपयांची रोकड असलेली तिजोरी चोरली होती. चोरीचा कोणताही पुरावा पोलिसांना मिळू नये म्हणून कंपनीतील सीसीटीव्ही कॅमेरा, हार्ड डिस्कही चोरट्यांनी चोरली होती. याप्रकरणी कंपनीचे मालक दीपक आव्हाड यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. त्यानंतर या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केला.
हेही वाचा - रात्र गेली हिशोबात! पोरगं नाही नशिबात; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर टीका
आणखी काही गुन्हे समोर येण्याची शक्यता -
या प्रकरणात गोटीराम श्रावण कोरडे व ओमकार दौलत किरकरे या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे दोन्ही आरोपी प्रबुद्ध नगर सातपूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी अतिशय चलाखीने ही चोरी केली. या चोरीबाबत अधिक तपास सुरू आहे. लवकरच आरोपींकडुन अन्य माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त पोलिसांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - ह्रदयद्रावक : कर्जबाजारीपणाला कंटाळून एकाच कुटुंबातील ६ व्यक्तींची आत्महत्या