नाशिक - गेल्या अनेक दशकांपासून दीपावलीनंतर येणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आद्य जोतिर्लिंग असलेल्या त्रंबकेश्वरला रथोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा मात्र या ऐतिहासीक रथोत्साची पंरपरा खंडीत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी या रथोत्सवाची परवानगी नाकारली आहे. प्रशानसाच्या या निर्णयामुळे भाविकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
दिवाळीनंतर वैकुंठ चतुर्दशीपासूनच त्र्यंबकेश्वर नगरीत यात्रोत्सवाला सुरुवात होते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देवदिवाळी म्हणून त्र्यंबकेश्वरचे भूषण असलेल्या ऐतिहासिक रथोत्सवाची या उत्सवाची जय्यत तयारी महिनाभर आधीपासूनच होत असते. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. यात आश्चर्यकारक बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वीच काही शासकीय अधिकाऱ्यांनी रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये आढावा दौरा केला होता.
इतर जिल्ह्यांमध्ये रथोत्सवाला परवानगी, त्र्यंबकेश्वरसाठी का नाही?
गुरुवारी रथोत्सवाला परवानगी नाकारण्यात आल्याच पत्र प्रशासकीय यंत्रणेकडून देवस्थान ट्रस्टला प्राप्त झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये रथोत्सावाला परवानगी असताना त्र्यंबकेश्वरसाठी वेगळा नियम का? असा प्रश्न त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
परवानगीसाठी नागरिकांनी केला न्यायालयात अर्ज-
त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुर या राक्षसाचा वध केल्याने गेल्या अनेक दशकांपासून यादिवशी त्र्यंबकेश्वर नगरीत हा रथोस्तव साजरा केला जातो. मात्र, यंदा रथोत्सवाची तयारी पूर्ण झालेली असताना प्रशासनाने परवानगी नाकारल्यानं नाराजीचा सूर उमटलाय. दरम्यान या यात्रेला परवानगी देण्यात यावी, यासाठी काही जणांनी न्यायालयात अर्ज देखील केला. या ऐतिहासिक रथोत्सवाला परवानगी मिळणार का हे बघण महत्वाचे ठरेल.