ETV Bharat / state

धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या; मनमाड लोहमार्ग पोलिसांची कारवाई - manmad railway police arrested thieves

धावत्या रेल्वेतून आणि मनमाड रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरणाऱ्या नाजीम इम्रान शेख (वय १९,रा मालेगाव) याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी आरोपीकडून जवळपास दीड लाख किंमतीचे दहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.

nashik
धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या; मनमाड लोहमार्ग पोलिसांची कारवाई
author img

By

Published : Dec 9, 2019, 8:39 PM IST

नाशिक - धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लाखो रूपयांचे मोबाईल जप्त करण्यात आले असून त्याने ४ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. चौकशीत आरोपीकडून अजून गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता आहे.

धावत्या रेल्वेतून मोबाईल चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास बेड्या; मनमाड लोहमार्ग पोलिसांची कारवाई
धावत्या रेल्वेतून आणि मनमाड रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरणाऱ्या नाजीम इम्रान शेख (वय १९,रा मालेगाव) याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी आरोपीकडून जवळपास दीड लाख किंमतीचे दहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. प्राथमिक चौकशीत त्याच्याकडून ४ गुन्ह्यांची कबुली मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन. के. मदने यांनी दिली. पुढील चौकशीत अजूनही काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे मदने यांनी सांगितले.

हेही वाचा - कर्नाटक पोटनिवडणूक निकाल : येडियुरप्पा सरकारचा धोका टळला, भाजपचा 12 जागांवर विजय

आरोपीसोबत अजून कोणी त्याचे साथीदार आहेत का? याचाही शोध घेण्याचे काम सुरू असून पोलीस स्थनाकात नोंद असलेल्या फिर्यादी तपासुन ज्यांचे मोबाईल आहेत, त्यांना परत करण्याचे काम पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईहून नांदेडकडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस मधून त्याला मनमाड रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा - 'विरोधी पक्षाची भूमिका नागपूर अधिवेशनापासून बजावू'

दरम्यान, सततच्या चोराच्या घटना लक्षात घेता चोरांना पकडण्यासाठी एक पथक तैनात करण्यात आले असुन यात रवींद्र इंगळे, दिनेश पवार, संतोष भालेराव, रोशन गोंडेकर, रुपेश ढवळे, किशोर कंदिळे, दिनेश कुरील यांची नेमणूक करण्यात आली आहे. याच पथकाने ही कारवाई केल्याचे मदने यांनी सांगितले.

हेही वाचा - भाजीपाल्याच्या दराचे वास्तव; कांदा वगळता सर्व काही कवडीमोल

रेल्वे स्टेशन परिसर आणि धावत्या रेल्वे गाड्यात होणाऱ्या गुन्ह्याची संख्या लक्षात घेता लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला असुन चोऱ्यांना आळा बसत आहे. याप्रकरणी अनेक आरोपींना अटक करून त्यांच्यावर केसेस करून त्यांना हद्दपार करण्याचे काम त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यामुळे आता नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला असुन अशीच कारवाई सुरू राहिली, तर अजून चोऱ्यांना आळा बसेल.

Intro:ब्रेकिंग:धावत्या रेल्वे गाडीतून मोबाईल चोरणारा अट्टल चोरास मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून
लाखोंचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत तर चार गुन्ह्याची कबुली देखील त्याने दिली आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कस्टडी देण्यात आली असुन त्याच्याकडून अजून गुन्ह्याची कबुली मिळण्याची शक्यता आहे.Body:धावत्या रेल्वेतुन व मनमाड रेल्वे स्थानक परिसरात मोबाईल चोरणाऱ्या नाजीम इम्रान शेख(वय १९,रा मालेगाव) याला मनमाड लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असुन त्याच्याकडून जवळपास दीड लाख किंमतिचे दहा मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.त्याला आज कोर्टात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली असुन त्याच्याकडून चार गुन्ह्याची कबुली मिळाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एन के मदने यांनी दिली तर अजूनही काही गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले, त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार आहेत का याचाही शोध घेण्याचे काम सुरू असून पोलीस स्थनाकात नोंद असलेल्या फिर्यादी तपासुन ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना परत करण्याचे काम पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले मुंबई वरून नांदेड कडे जाणाऱ्या तपोवन एक्स्प्रेस मधून त्याला मनमाड रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली आहे.नेहमी होणाऱ्या चोऱ्या लक्षात घेता चोरांना पकडण्यासाठी एक पथकच तैनात करण्यात आले असुन यात रवींद्र इंगळे,दिनेश पवार,संतोष भालेराव,रोशन गोंडेकर, रुपेश ढवळे किशोर कंदिळे दिनेश कुरील आदींची नेमणूक आहे यांनीच आज ही कारवाई केल्याचे मदने यांनी सांगितले.Conclusion:रेल्वे परिसर आणि धावत्या रेल्वे गाड्यात होणाऱ्या गुन्ह्याची संख्या लक्षात घेता लोहमार्ग पोलीस व आरपीएफ यांनी चोख बंदोबस्त ठेवला असुन अनेक चोऱ्यांना आता आळा बसत आहे अनेकांना अटक करून त्यांच्यावर केसेस करून त्यांना हद्दपार करण्याचे काम त्यांच्या मार्फत करण्यात येत आहे यामुळे आता नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला असुन अशीच कारवाई सुरू राहिली तर अजून जास्त प्रमाणात चोऱ्यांना आळा बसेल
बाईट
एन के मदने लोहमार्ग पोलीस निरीक्षक मनमाड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.