ETV Bharat / state

VIDEO : नागाशी पंगा पडला महागात.. ४ वेळा दंश केल्याने तरुणाची जीवन-मृत्यूशी झुंज - नाशिकमध्ये मद्यधुंद तरुणाला नागाचा चावा

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील एका मद्यधुंद तरुणाला नागाशी मस्ती करणं चांगलच महागात पडले आहे. नागाने तरुणाला तब्बल चार वेळा दंश केल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली असून रुग्णालयात त्याची जीवन-मृत्यूशी झुंज सुरू आहे. मंगेश गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे.

drunken young man was bitten by a snake in nifad

author img

By

Published : Mar 12, 2021, 5:32 PM IST

Updated : Mar 12, 2021, 6:29 PM IST

नाशिक - निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील एका मद्यधुंद तरुणाला नागाशी मस्ती करणं चांगलच महागात पडले आहे. नागाने तरुणाला तब्बल चार वेळा दंश केल्याने त्यांची प्रकृती गंभीर बनली असून रुग्णालयात त्याची जीवन-मृत्यूशी झुंज सुरू आहे. मंगेश गायकवाड असे जखमी तरुणाचे नाव आहे.

तरुणाला नागाशी मस्ती करणं पडले महागात -

निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर येथील मद्यपी मंगेश भाऊसाहेब गायकवाड या तरुणाने जिल्हा परिषद शाळेच्या आवारात नाग दिसताच त्याने नागाशी मस्ती सुरू केली. यावेळी अनेक ग्रामस्थांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याने कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता. मंगेश इतका नशेत होता की त्याने आपली पॅन्ट काढून फेकून दिली होती. तो यावेळी अर्धनग्न अवस्थेत होता. या मस्ती दरम्यान नागाने मंगेशला चार वेळा चावा घेतला. चावा घेतल्याच्या रागात मंगेशने नागाला हाताने ठेचून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंगेशला नागाने चार वेळा दंश केला.

नागाशी पंगा पडला महाग
हे ही वाचा - नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश
मंगेशची मृत्यूशी झुंज -

नागाने चावा घेतल्याने मंगेशची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला निफाड येथे प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अद्यापही मंगेशची प्रकृती चिंताजनक असल्याने मंगेश हा मृत्यूशी झुंज सुरू आहे.

हे ही वाचा - भारत सरकारचा 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' साजरा करण्याचा निर्णय, शरद पवारांनी निर्णयाचे केले स्वागत

Last Updated : Mar 12, 2021, 6:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.