नाशिक - राज्यात समन्वयाचा अभाव असून ठाकरे सरकार करोना पाॅझिटिव्ह रुग्णांचे आकडे लपवत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते व माजी जलसंपदा मंत्री गिरिश महाजन यांनी केला. तसेच राज्यात करोनाचा संसर्ग वाढत आहे. मुंबईत परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढला. काही नेते अजुनही घरी बसले असून हात धुवा, सॅनिटायझर लावा, असे बोंबलून काही होणार नाही,अशी टीकाही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार - २ मधील प्रथम वर्षपुर्ती निमित्त केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडत देशात मोदींकडून केले जात असलेल्या कामाचे कौतुक केले.
महाजन पुढे म्हणाले, डाॅक्टर, पोलीस यांना फक्त लढ म्हणून चालणार नाही तर त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे अपेक्षित आहे. टेस्टिंगबाबत राज्यभरात अनागोंदी कारभार आहे. जळगावला तर १२ दिवसांनी रिपोर्ट येतो. म्हणून झपाट्याने रुग्णसंख्या वाढत आहे. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वय नाही, असा आरोपही त्यांनी केला.
ठाकरे सरकार 'कोरोना' आकडे लपवतंय - गिरिश महाजन - Girish Mahajan alleged on gov
राज्य सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे महाराष्ट्रात करोनाचा प्रादुर्भाव वाढला. काही नेते अजुनही घरी बसले असून हात धुवा, सॅनिटायझर लावा, असे बोंबलून काही होणार नाही,अशी टीका भाजप नेते आणि माजी मंत्री गिरिश महाजन यांनी केली.