ETV Bharat / state

दूध दर आंदोलन: मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा 'स्वाभिमानी'चा इशारा - दिंडोरी स्वाभिमानी आंदोलन बातमी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान मिळावे, दुध भुकटी आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकाने रद्द करावा असा प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे.

swabhimani-shetkari-sanghatana-agitation
दूध दर आंदोलन
author img

By

Published : Jul 21, 2020, 12:36 PM IST

दिंडोरी (नाशिक)- स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज राज्यव्यापी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येत आहे. दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी अनुदान मिळावे, दुध भुकटी आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकाने रद्द करावा असा प्रमुख मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी चिंचखेड येथील प्राचीन शिवमंदीरात दुग्ध अभिषेक करुन सरकारला चांगली सुबुध्दी येवू दे, अशी प्रार्थना केली.

दूध दर आंदोलन,,,

पाण्याच्या बाटलीपेक्षा दुधाचा भाव कमी आहे. यामुळे दुधाला तत्काळ 5 रुपये अनुदान मिळावे, 10 हजार टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा, 30 हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, निर्यात अनुदान प्रति किलो 30 रुपये देण्यात यावे, दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावी, पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जमा करावे, या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास स्वाभिमानीकडून तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संदीप जगताप यांनी दिली आहे.

आजच्या दिवसाचे दूध प्रत्येक गावात गोरगरिबांना, गरजूंना मोफत वाटले जाणार गेले आहे. महाराष्ट्रातील अनेक मोठ्या दूध संघांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.