ETV Bharat / state

बोलेरो व दुचाकीच्या अपघातात स्टेट बँकेचे व्यवस्थापक जागीच ठार

author img

By

Published : Jul 17, 2020, 8:16 PM IST

बोलेरो गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री वणीच्या संखेश्वर मंदिर परीसरात हा अपघात झाला.

State Bank manager died in bolero and two-wheeler accident in nashik
बोलेरो व दुचाकीच्या अपघातात स्टेट बँकेचे व्यवस्थापक जागीच ठार

दिंडोरी (नाशिक) - बोलेरो गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. वणीच्या संखेश्वर मंदिर परीसरात हा अपघात गुरुवारी रात्री झाला. या अपघातात एक जण जखमी झाला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार, अभोणा येथून दुचाकीवस्वार नाशिकला जात असताना समोरुन येणाऱ्या बोलेरोने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये अभोण्याचे स्टेट बँकेचे व्यवस्थापक जागीच ठार झाले तर त्यांच्यासमवेत असलेले अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत.

अनिल मोतीराम जगताप (रा. म्हसरूळ, नाशिक) हे अभोणा तालुका कळवण येथे स्टेट बँक आॕफ इंडियामध्ये शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. ते दररोज दुचाकीने (mh15bn9948) अपडाऊन करत होते. गुरुवारी बँकेचे कामकाज आटोपल्यानंतर ते अभोणा येथून आपले सहकारी पंकज झा यांच्यासमवेत दुचाकीवर निघाले. यावेळी संखेश्वर मंदिर परिसरालगत समोरुन येणाऱ्या भरधाव बोलेरोने (एम एच 15 बि एन 540) दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात अनिल जगताप हे ठार झाले, तर पंकज झा हे जखमी झाले.

या दोघांना प्राथमिक तपासासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता जगताप यांना मृत घोषीत केले. तर पंकज यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. उपचारानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिकला हलवण्यात आले आहे. याबाबत बोलेरो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस स्टेशनचे एपीआय सागर शिम्पी यांच्या मार्गदर्शनाखाली हरिचंद्र चव्हाण करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.