ETV Bharat / state

एसटीकडून दिवाळीनिमित्त जादा बसेस नियोजन, कोरोना काळात प्रवाशांची विशेष काळजी

दिवाळीनिमित्त अनेक नागरिक गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी नाशिक विभाग एसटी महामंडळ कडून 63 जादा बसेसचे नियोजन केले असून ह्या बसेस नाशिकहून मुंबई, धुळे, जळगाव, औरंगाबाद आदी मार्गांवर धावणार आहे. तसेच, प्रवाशांची गर्दी बघता बसेसच्या संख्येत देखील वाढ केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सागितले आहे.

नाशिक दिवाळीनिमित्त जादा बसेस नियोजन न्यूज
एसटीकडून दिवाळीनिमित्त जादा बसेस नियोजन
author img

By

Published : Nov 13, 2020, 5:12 PM IST

नाशिक - दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता एसटीकडून जादा बसेस नियोजन करण्यात आले असून एसटी महामंडळाकडून 63 जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

दिवाळीनिमित्त अनेक नागरिक गावी जात असतात. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी नाशिक विभाग एसटी महामंडळ कडून 63 जादा बसेसचे नियोजन केले असून ह्या बसेस नाशिकहून मुंबई, धुळे, जळगाव, औरंगाबाद आदी मार्गांवर धावणार आहे. तसेच, प्रवाशांची गर्दी बघता बसेसच्या संख्येत देखील वाढ केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सागितले आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: फटाक्यांवर बंदी काळजी कशाला, आहेत ना चॉकलेट-फटाके

कोरोनामुळे विशेष खबरदारी

कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे एसटी महामंडळाला करोडो रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. मात्र, अनलॉकनंतर पुन्हा एकदा एसटी रस्त्यावर आली असून प्रवासीदेखील सुरक्षित प्रवास म्हणून दिवाळी निमित्ताने गावाला जाण्यासाठी एसटीच्या प्रवासाला प्रधान्य देत आहे. कोरोनाचा प्रादुभाव लक्षात घेता एसटी महामंडळाने विशेष खबरदारी घेतली आहे. एसटी निघण्यापूर्वी एसटीमधील सर्व आसने सॅनिटाईझ केली जात आहेत. तसेच, एसटीमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी भाडे वाढ नाही

उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि दिवाळी काळात अनेकदा एसटीकडून भाडेवाढ केली जात असते. मात्र, यंदा एसटी महामंडळाने हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

खानदेशात जाण्यासाठी जादा बसेस

नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव आदी खान्देशी भागातील नागरिक कामानिमित्त नाशिक शहरात स्थानिक झाले आहेत. दिवाळी निमित्त दरवर्षी हजारो नागरिक गावाला जात असतात. एसटीचा प्रवास सुरक्षित आणि कमी खर्चात असल्याने अनेक प्रवासी कुटुंबासमवेत एसटी बसने प्रवास करतात. तसेच अनेक महिला लक्ष्मीपूजन सण साजरा केल्यानंतर भाऊबीजेला माहेरी जाण्यासाठी एसटीच्या प्रवासाला अधिक पसंती देत असल्याने एसटी महामंडळाने त्या पद्धतीने जादा बसचे नियोजन केले आहे.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या पॅकेजवर विदर्भातील शेतकऱ्यांची नाराजी, सरकार विर्दभासोबत दुजाभाव करत असल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.