नाशिक - आज सकाळी नऊच्या सुमारास विमानातून पॅराशूटद्वारे जमिनीवर उडी मारण्याचे प्रात्यक्षिक करत असताना नाशिक उपनगर परिसरात पॅराशूट बाभळीच्या झाडावर कोसळले. यामध्ये एक जवान बाभळीच्या झाडावर अडकला होता. या जवानाला मनीष काठे या तरुण शेतकऱ्याने सुखरूप बाहेर काढले.
यामध्ये भाबळीचे काटे टोचल्यानं जवान किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने यात मोठी हानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनस्थळी दाखल झाले होते.
या ठिकाणचे बाभळीचे झाड पाडून जवानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी आर्मीचे अधिकारी मदतीसाठी तात्काळ दाखल झाले होते. दैनंदिन सराव करत असताना 3 पॅराशूट भरकटले होते. यातील 2 जवान सुखरूप खाली उतरले. मात्र, यातील 1 जवान झाडावर अडकल्याने किरकोळ जखमी झाला आहे.
