नाशिक - मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील रवींद्र शिंदे यांच्या घरात चुलीवर जेवण बनवत असताना अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण झोपडी सहित घरातील अन्न धान्य, कपडे जळून खाक झाले. ह्या बातमीचे फोटो बघून नाशिकच्या चिमुकल्या शाहू देवरेने आपले वडील वैभव देवरे यांना ह्या कुटूंबाला मदत करण्यास सांगितले. एवढेतच नाही तर आपल्या खाऊचे पैसेही दिले. चिमुकल्या शाहूने दाखवलेली सामाजिक बांधिलकीला अनुसरुन शाहूच्या वाढदिवासाचे औचित्य साधत शिंदे परिवाराला आर्थिक मदत केली आहे.
हा आहे मदतीचा स्वरुप
काही दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील रवींद्र शिंदे यांच्या घराला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण झोपडी जळून खाक झाली. या घटनेचे फोटो बघून शाहू देवरे याने वडिलांना ह्या कुटूंबाला मदत करण्याची भावना व्यक्त केली. शाहूच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रवींद्र शिंदे यांनी 11 हजार 111 मदत केली आहे. तसेच घराला लागणारे सर्व साहित्य शिंदे कुटूंबाला देत मदत केली आहे.
हेही वाचा-यंदाही संकट काळात शेतीच पेटवतेय चूल; शेतीच्या कारखान्यातील रोजगार सुरूच
हेही वाचा-तासंनतास उन्हात उभे, प्यायला पाणी नाही, अमरावतीत नोंदणीसाठी आलेल्या कामगारांचे हाल