ETV Bharat / state

नाशकातील स्मार्ट रोड शहरवासीयांसाठी ठरतोय डोकेदुखी

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रोडवर स्मार्ट रोडचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. जागतिक दर्जाचा हा रस्ता असून विविध सेवा यामध्ये दिल्या जाणार आहेत. मात्र 18 महिने उलटून ही रस्त्याचे काम पूर्ण होत नाहीये.हे स्मार्ट रस्ते नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

author img

By

Published : Jun 16, 2019, 5:08 PM IST

नाशकातील स्मार्ट रोड शहरवासीयांसाठी ठरतोय डोकेदुखी

नाशिक - शहरात सध्या स्मार्ट रस्ते निर्मिती सुरू आहे. मात्र, हे स्मार्ट रस्ते नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. दीड वर्षे उलटूनही ठेकेदारांकडून रस्ता पूर्ण होत नसल्याने नागरिकांसह स्मार्ट सिटीचे अधिकारी देखील हतबल झाले आहेत.

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रोडवर स्मार्ट रोडचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. जागतिक दर्जाचा हा रस्ता असून विविध सेवा यामध्ये दिल्या जाणार आहेत. मात्र 18 महिने उलटून ही रस्त्याचे काम पूर्ण होत नाहीये.

या रस्त्यावर सरकारी कार्यालय, शाळा महाविद्यालय, बसस्थानक आणि न्यायालय असून हा शहरातील अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे. रस्त्याची कामे सुरू असल्याने व्यावसायिकांना आपली दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे.

स्मार्ट रोडचे काम संथ गतीने सुरू असल्याने स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला नोटीस पाठवल्या होत्या. आतापर्यंत चार वेळेस नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. तरीदेखील रस्त्याच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने धिकाऱयांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. याचबरोबर स्मार्ट रोडमुळे जो त्रास नाशिकरांना सहन करावा लागत आहे, त्याबद्दल अधिकारी माफी मागत आहेत.

दरम्यान, पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडे रेटा लावून कामे तातडीने पूर्ण करण्याची गरज आहे. अन्यथा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील नोटीस सत्र हे नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरणार असून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना नागरिकांच्या या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.

Intro:नाशिक शहरात सुरू असलेले स्मार्ट रोड नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरत आहे ठेकेदारांकडून दीड वर्षे उलटूनही रस्ता पूर्ण होत नसल्याने नागरिक सोडा स्मार्ट सिटी चे अधिकारी हतबल झालेय.. अक्षरशः नाशिककरांपुढे अधिकाऱ्यांना माफी मागावी लागत आहे

Body:नाशिक शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रोडवर स्मार्ट रोडच्या प्रकल्प राबविण्यात येतोय जागतिक दर्जाचा हा रस्ता असून विविध सेवा यामध्ये दिल्या जाणार आहे मात्र 18 महीने उलटून गेले तरीही रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही याच रस्त्यावर सरकारी कार्यालय, शाळा महाविद्यालय, बसस्थानक आणि न्यायालय आहे त्यामुळे शहरातील अत्यंत वर्दळीचा हा रस्ता आहे रस्त्यालगत असलेल्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याची वेळ आली स्मार्ट रोड अक्षरशः नाशिककरांसाठी वर्षापासून डोकेदुखी ठरत आहे स्मार्ट रोडचे काम संथ गतीने सुरू असल्याने स्मार्ट सिटी च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला नोटीस सत्रांचे सत्र सुरू केले होतं आत्तापर्यंत चार वेळेस नोटिसा दिल्या केल्या मात्र तरीदेखील कामकाजात सुधारणा होत नसल्याने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे तर नागरिकांना स्मार्ट रोड मुळे जो त्रास सहन करावा लागतोय त्याबद्दल अधिकाऱ्यांना माफी मागावी लागत आहे

Conclusion:दरम्यान पावसाळा तोंडावर आल्याने आता अधिकाऱ्यांनी ठेकेदाराकडे रेटा लावून काम तातडीने पूर्ण करायची गरज आहे अन्यथा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील नोटीस सत्र नाशिककरांसाठी डोकेदुखी ठरेल इतकच नव्हे तर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना नागरिकांच्या या रोषाला सामोरे जावे लागेल

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.