नाशिक : नाशिकमध्ये ड्रायव्हरने मालकाची लूट केल्याच समोर आले ( driver looted Builder in nashik ) आहे. नाशिक शहरातील बड्या बांधकाम व्यवसायिकास कार्यालयातून जवळच ही घटना घडली.निवासस्थानी सोडण्यासाठी जाणाऱ्या कारचालकाने मालकास घरी न उतरवता मध्येच एका जोडीदाराला कारमध्ये (Robbery with friend help ) बसवत मालकाला पिस्तुलीचा धाग दाखवत ( Robbery at gunpoint ) तब्बल 66 लाखांची रोकड लांबवल्याचा प्रकार घडला आहे. सरकारवाडा पोलिसांत जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा : पोलिसांना दिलेल्या तक्रारीत बांधकाम व्यवसायिक कन्हैयालाल मनवाणी हे कुलकर्णी गार्डन परिसरातील हॅपी होम डेव्हलपर्स या आपल्या कार्यालयातून घरी परतत होते. त्याचवेळी कारचालक देविदास शिंदे याने शरणपूर रोडवरील एका वळणावर कार थांबवत मित्रालासोबत घेतले. यावेळी मनवाणी यांनी चालकाला हटकले हे कोण आहेत, यांना का बसवले, असे विचारून लागतच पाठीमागे बसलेल्या संशयिताने पुढच्या सीटवरील मनवाणी यांच्या डोक्याला पिस्तूल लावून बडबड बंद कर नाहीतर ठोकून देऊ असे धमकवले. काही मिनिटातच गाडी महामार्गाच्या दिशेने विल्लोळी पुलावरून जैन मंदिरासमोर कार थांबवली. मनवाणी यांच्याकडून 66 लाखांची रोकड लुटत त्यांना कारमधून खाली उतरून दिल्यानंतर दोघांनीही कार पळून नेत मुंबईच्या दिशेने धूम ठोकली. याबाबत मनवाणी यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
5 पथके रवाना : सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात असून संशयित करचालकाची माहिती घेत त्याच्या शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आले आहेत,पथकाला धागेद्वारे हाती लागले आहेत ,अशा घटना रोखण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी वाहनावरील चालकाची माहिती घेणे महत्त्वाचे असल्याचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी सांगितले.