ETV Bharat / state

Nashik : धक्कादायक! काकांनीच केला पुतण्याचा खून

author img

By

Published : Nov 3, 2022, 3:32 PM IST

दिंडोरी रोडवरील मेरीच्या शासकीय वसाहतीत राहणारे कनिष्ठ लिपिक संतु वसंत वायकंडे (वय 38) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन हजाराच्या वादातून ही हत्या ( uncle killed the nephew in nashik) झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

uncle killed the nephew in nashik
काकांनीच केला पुतण्याचा खून

नाशिक: दिंडोरी रोडवरील मेरीच्या शासकीय वसाहतीत राहणारे कनिष्ठ लिपिक संतु वसंत वायकंडे (वय 38) यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने अवघ्या बारा तासातच खुनाचा छडा लावत दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावातून वायकंडे यांचे मावस काका संशयित निवृत्ती हरी कोरडे (वय 59) यांना अटक केली. दोन हजाराच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.

शाब्दिक वाद झाला: पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेरीच्या शासकीय वसाहती मधील खोलीत संतु वसंत वायकंडे हे आपली पत्नी लता आणि आपल्या दोन शाळकरी मुलांसह राहत होते. ते मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पात कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरीला होते. दिवाळीनिमित्त पत्नी, मुले तीन दिवसापूर्वी माहेरी गेले होते. वायकंडे हे घरी एकटेच होते. अशात वायकंडे यांनी आपल्या मावस काकांना पार्टीसाठी बोलवले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत मद्य पार्टी झाली. मद्याच्या नशेत काका पुतण्यामध्ये शाब्दिक वाद झाला.

चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या: चार महिन्यापूर्वी कोरडे यांच्याकडून वायकंडे यांनी उसनवार घेतलेल्या दोन हजार रुपयाची त्यांनी मागणी केली. यावेळी दोघांमध्ये हाणामारी झाली. याचा राग धरून कोरडे यांनी वायकंडे यांची झोपेत असताना चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली (uncle killed the nephew in nashik). सकाळी सात वाजता आपल्या मूळ गावी ते निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास पत्नी मुले घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडून बघितला असता वायकंडे हे बेशुद्ध अवस्थेत त्यांना आढळून आले. त्यांनी तत्काळ त्यांच्या भावाला बोलून घेत जिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. बुधवारी संशयित कोरडे याला पंचवटी पोलीसांनी अटक केली.

सीसीटीव्ही वरून लागला छडा: संशयित कोरडे हे सोमवारी रात्री वायकंडे यांच्या घरी आले होते. त्या व्यतिरिक्त सोमवारी रात्रीपासून मंगळावर पर्यंत कोणीही त्यांच्या घरी आले नसल्याचे लक्षात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तशी खात्री पटली. त्यावरून पोलिसांनी संशयित कोरडे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्यावेळी त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. वायकांडे यांनी मद्य अवस्थेत लाथा बुक्यांनी मारहाण केल्याचा राग मनात होता त्यामुळे त्यांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केल्याचे संशयित कोरडे यांनी कबुली दिली आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.