नाशिक - महापालिका निवडणुका स्वतंत्र लढावयाच्या की महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुका लढणार, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. मात्र, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते पूर्णपणे तयारीत असल्याचे शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर मधुकर यांनी सांगितले. आज शिवसेना कार्यालयात बोलवण्यात आलेल्या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनेची ही भूमिका स्पष्ट केली.
अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी महानगरपालिकेवर आपला महापौर असेल, असा दावा केला आहे. याच अनुषंगाने नाशिकमध्ये सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पक्ष वरिष्ठांच्या भेटीगाठी आणि स्थानिक पातळीवर बैठकांना सध्या सुरुवात झाली असून, मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेची देखील तातडीने बैठक बोलावण्यात आली होती.
हेही वाचा - नांदेडमध्ये अपघाताची पुनरावृत्ती; राष्ट्रीय महामार्ग प्रशासन झोपेतच
नाशिकच्या शिवसेना कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीत सर्वच स्थानिक पदाधिकारी नगरसेवक आणि नेते उपस्थित होते. या बैठकीत नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला, तसेच महानगर पालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्रितपणे लढवणार, की स्वतंत्रपणे, याचा निर्णय पक्षातील वरिष्ठ घेणार असून, पक्ष घेईल त्या निर्णयासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचे मधुकर यांनी सांगितले.
भाजप फक्त सुडाचे राजकारण करते
भाजप फक्त सुडाचे राजकारण करत असून, राजकारण करण्याऐवजी भाजपने राज्य आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करावे, असा टोला महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी लगावला. या बैठकीला नाशिकमधील सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - दादा, तुम्ही विधानसभेचे विराट कोहली आहात.., रोहित पवारांच्या फटकेबाजीवर कार्यकर्त्यांची कमेंट