ETV Bharat / state

Shinde group Criticized Sanjay Raut In Nashik: खासदार संजय राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नाही, शिंदे गटाची टीका - संजय राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नसल्याची टीका

संजय राऊत यांचा डीएनए शिवसेनेचा नाहीच (Sanjay Raut DNA not belonging to ShivSena), अशी टीका शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आणि अजय बोरस्ते यांनी केली (Shinde group Criticized Sanjay Raut In Nashik) आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार संजय राऊत नाशिकला आले असता ज्या शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश (Entry of Shiv Sainiks into Shinde Group) केला त्यांच्यावर त्यांनी सडकून टीका केली होती. त्यांना उत्तर देण्यासाठी आज शिंदे गटाने पत्रकार परिषद (Shinde Group Press Conference Nashik) घेत संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला.

Shinde group Criticized Sanjay Raut In Nashik
शिंदे गटाची टीका
author img

By

Published : Jan 9, 2023, 2:59 PM IST

शिंदे गटाची नाशिकमध्ये संजय राऊतांवर टीका

नाशिक : राऊत हे शरद पवारांकडे जाऊन शिवसेना संपवण्याचे काम करत आहेत (Shinde group Criticized Sanjay Raut In Nashik). संजय राऊत, तुडवा तुडवी काय असते ते तुम्हाला आम्ही दाखवू. कुठे यायचे हे सांगा. राऊत नाशिकला शनिवार, रविवार फक्त पर्यटनासाठी येतात. तुम्ही स्वतः सरपंच पदाची निवडणूक लढवली नाही, (Entry of Shiv Sainiks into Shinde Group) अशा शब्दात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला. (Sanjay Raut DNA not belonging to ShivSena)

शिवसेना कार्यालयावर दावा करणार : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात मी जे गेले त्यांना ओळखत नाही. माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे. याबाबतची कागदपत्रे शिंदे गटाचे रुपेश पालकर यांनी पत्रकार परिषदेत सादर केले. तसेच त्या कार्यालयावर आम्ही दावा करणार असल्याचे पालकर यांनी म्हटले.

शिपायाची बदलीसुद्धा करता येत नव्हती : राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेण्याचे कट कारस्थान संजय राऊत यांचे होते. अनैसर्गिक युतीला संजय राऊत कारणीभूत आहे. सत्ता असताना देखील आम्ही साधी शिपायाची बदली करू शकत नव्हतो, अशी अशी खंत खासदार हेमंत गोडसे यांनी व्यक्त केले.

संजय राऊत बांडगुळ : संजय राऊत फक्त हिशोब घ्यायला नाशिकला येतात. शिवसेना हा वटवृक्ष; पण संजय राऊत बांडगुळ. बांडगुळ हे वटवृक्ष संपवतात. संजय राऊत स्वतःला प्रति उद्धव ठाकरे समजतात. त्या दिवशी म्हणतात चप्पल चोर गेले, आम्ही चप्पल चोर नाही. तर खरा देव आदरणीय हिंदुहृदयसम्राट आमच्या सोबत आहेत असे शिंदे गटाचे अजय बोरस्ते यांनी म्हटले.

शिंदे गटात कार्यकर्त्यांचा प्रवेश : शिंदे गटाचे ठाकरे गटाला एकामागून एक धक्के सुरूच ( Thackeray group shocked Shinde group ) आहेत. एकनाथ शिंदे गटात सातत्याने ठाकरे गटातून पदाधिकारी कार्यकर्ते जाण्याचा प्रवाह काही कमी होताना दिसत नाही. अलीकडेच नाशिकच्या काही स्थानिक पदाधिकारी आणि नेतेमंडळीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात प्रवेश केला. नाशिक मधील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, संघटक, शाखाप्रमुख, वाहतूक सेना, युवा सेनेच्या पदाधिकारी आणि नेतेमंडळी मिळून जवळपास 60 जणांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला ( Local Leaders Join Shinde group in Nashik ) आहे.

एकनाथ शिंदेंचा टोला : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारने लोकहितवादी निर्णय घेतले. शेतकरी कष्टकरी महिला सर्वच वर्गांना न्याय देण्याचा प्रयत्न या अधिवेशनातून पुन्हा एकदा आमच्या सरकारने केला. मात्र वेगवेगळ्या विषयावरून अधिवेशनात गोंधळ घालण्याचा प्रयत्न विरोधकांचा होता. हे सरकार जनतेसाठी काम करत आहे. याची धास्ती विरोधकांनी घेतली असल्याचा टोल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधकांना लगावला आहे.

आम्ही मेंढरे नाहीत हे लवकरच दाखवू : शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत; मात्र ते नाशिकच्या दौऱ्यावर असतानाच मोठ्या प्रमाणात नाशिकच्या स्थानिक पदाधिकारी नेत्यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, पक्षातली काही मेंढरं इकडे तिकडे जात आहेत. मात्र आम्ही मेंढरं नाहीत नाशिक मधील शिवसैनिक आहोत त्यामुळे लवकरच खासदार संजय राऊत यांना आम्ही मेंढरं नाही आहोत हे दाखवून देऊ असा इशारा स्थानिक नाशिक विधानसभा प्रमुख योगेश बेलदार यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.