नाशिक - शीख धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या मनमाड शहरातील गुरुद्वारात रविवारी गुरु दा गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सालाना जोडमेला निमित्त गुरुद्वारात अखंड पाठ समाप्ती, भजन, कीर्तन, लंगर यांसह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातून भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. त्यात तलवारबाजीची चित्त थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. या सोहळ्यासाठी पंजाब, हरियाणा, दिल्ली यासह देश भरातून मोठ्या संख्येने भाविक आले होते.
हेही वाचा - नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात नाशिकमध्ये निषेध सभा
अमृतसर आणि नांदेडनंतर मनमाडचा गुरुद्वारा मानला जातो. येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात गुरु दा गद्दी सोहळा आणि सालाना जोडमेला साजरा करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही हा सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंग कारसेवावाले यांच्या नेतृत्वाखाली भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती. यावेळी शीख बांधवानी तलवारबाजी सह इतर चित्त थरारक प्रात्याक्षिके दाखविली. गुरुद्वारा येथून काढण्यात आलेली शोभायात्रा पालिकेजवळ आल्यानंतर येथे नगराध्यक्षा पद्मावती धात्रक यांनी यात्रेचे स्वागत करून धर्मगुरूंचा सत्कार केला. त्यानंतर शोभायात्रा एकात्मता चौकात आल्यावर शिवसेना प्रणित वंदेमातरम मित्र मंडळातर्फे शिवसेना आमदार सुहास कादे शहर प्रमुख मयूर बोरसे यांनी स्वागत करून धर्मगुरूंचा सत्कार केला.
हेही वाचा - VIDEO : जेसीबीने पाईपलाईन तोडल्याने उडाल्या पाण्याच्या उंच कारंज्या; लाखो लिटर पाणी वाया
भारतातील प्रमुख गुरुद्वारांपैकी हा एक गुरुद्वारा आहे. येथील धार्मिक कार्यक्रमास संपूर्ण भारतातुन शीख बांधव येतात. वर्षाचा सालाना जोडमेला निमित्त शीख बांधव जमले होते. मोठ्या थाटामाटात आजचा हा सालाना जोडमेला संपन्न झाला. यावेळी सर्वधर्मीय देखील उपस्थित होते.