नाशिक : सध्या महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहे. आज धर्म आणि जात यावर वाद सुरू आहे. एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. हे सगळे सोडून सगळ्यांना घेऊन अयोध्येला जायचे, यात प्राधान्य कशाला द्यायचे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
चौकशी झाली पाहिजे, पण जेपीसी योग्य नाही : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जेपीसी भूमिके बाबत प्रत्येक पक्षाला एखाद्या प्रश्नावर स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी जी भूमिका घेतली, त्याबद्दल माझी काही तक्रार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. संसदेत खासदारांनी काय बोलावे, यावर वेगवेगळी मतं असू शकतात. चौकशी झाली पाहिजे, पण जेपीसी योग्य नाही. कारण लोकसभेचे आणि राज्यसभेचे खासदार यावर त्याची रचना ठरते. यात सत्ताधारी बहुमत असते. पण जर सगळ्या विरोधकांची भूमिका असेल तर जेपीसी चालवा, पण जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची समिती नेमली तर ती जास्त प्रभावी ठरेल आणि ती विश्वसनीय असेल असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
सावरकरांच्या काही भूमिकाला आमचा पाठिंबा नाही : माझे स्पष्ट मत आहे की, कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव नक्की आहे. त्यामध्ये कोणतीही शंका नाही. त्या ठिकाणी काँग्रेस सत्तेत येईल असा विश्वसही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. काही ठिकाणी नक्कीच आमचे उमेदवार असतील. मात्र, सावरकरांच्या बाबत सर्वांचीच भूमिका सारखी असेल असे नाही. सावरकरांची भूमिका ही गाय हा उपयुक्त पशु अशी होती. त्यावर आपण वारंवार चर्चा करावी असा मुद्दा नाही. तसेच, सर्वच बाबतींत जसे मतभेद असतात तसे याबाबतही आहेत. आणि ते काही मिटणारे नाहीत असही ते म्हणाले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगण भुजबळही उपस्थित होते. याचवेळी त्यांनी ईव्हीएमवरही भाष्य केले आहे. प्रश्न असा आहे की जी ईव्हीएम मशीनमध्ये चीप टाकली जाते. त्यावर काही तज्ञ लोकांना शंका आहे. आमची शंका दूर करावी. आमची काही तक्रार नाही. पण जर तशीच निवडणूक घेतली, तर आमची शंका आहे असेही पवार यावेळी म्हणाले आहेत.
हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले रामलल्लाचे दर्शन; मंदिर उभारणी कामाची केली पाहणी