नाशिक - गृहकर्ज अथवा कुठलेही कर्ज मंजूर करण्यासाठी लाच घेणाऱ्या मालेगाव येथील एसबीआय अधिकाऱ्याला सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. मलाई कांचन असे या अधिकाऱ्याचे नाव असून, त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
गृहकर्ज मंजूर मागितीली लाच
मिळालेल्या माहिती नुसार, एका ग्राहकाला गृहकर्ज मंजूर करण्यासाठी मालेगाव येथील एसबीआय बँकेचे अधिकारी मलाई कांचन यांनी 80 हजार रुपयांची लाच मागितली. या लाचेचा पहिला हप्ता 10 हजार रुपये ठरला होता, त्यानुसार 10 हजारांची लाच स्वीकारताना कांचन यांना सीबीआयच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, याप्रकरणी गृहकर्ज समुपदेशक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तीने थेट सीबीआय उच्चपदस्थ अधिकाऱ्याकडे तक्रार केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
या घटनेनंतर सीबीआय पथकाने कांचन यांना अटक केली असून, याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. या कारवाईनंतर कांचन यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक आनंद रुईकर, सुशील शिंदे, रोहित यादव, प्रवीण स्वामी, अजय पॉल, विनीत जैन यांचा समावेश होता.