ETV Bharat / state

Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर मतदारसंघ; सत्यजित तांबे ६८ हजार ९९९ मतांनी विजयी, शुभांगी पाटील यांचा पराभव

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघासाठी पहिल्या पसंतीची सर्वाधिक ६८ हजार ९९९ मत मिळवून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सत्यजित तांबे यांना प्रमाणपत्र देवून विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.

Nashik Graduate Constituency
सत्यजित तांबे विजयी
author img

By

Published : Feb 3, 2023, 6:56 AM IST

Updated : Feb 3, 2023, 7:08 AM IST

नाशिक: विभागीय आयुक्त गमे यांनी पहिल्या पसंतीच्या १ लाख २९ हजार ६१५ मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाल्याची घोषणा करत उमेदवारांना प्राप्त मतांची माहिती दिली. विजयी उमेदवारासाठी ५८ हजार ३१० मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. सत्यजित तांबे यांनी निश्चित कोट्यापेक्षा १० हजार ६८९ मते अधिक प्राप्त केली. त्यांना ६८ हजार ९९९ मत प्राप्‍त झाली आहेत. एकूण मतमोजणी नतंर १ लाख १६ हजार ६१८ मत वैध ठरली तर १२ हजार ९९७ मत अवैध ठरल्याचे त्यांनी सांगितले.

उमेदवाराचे प्रमाणपत्र केले प्रदान: मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक, जिल्हाधिकारी नाशिक तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण्, डी.जिल्हाधिकारी अहमदनगर तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी धुळे तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा, जिल्हाधिकारी जळगाव तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमन मित्तल, जिल्हाधिकारी नंदूरबार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा खत्री, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त (प्रशासन) रमेश काळे, उपायुक्त उन्मेष महाजन यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, मतमोजणी पर्यवेक्षक, सहपर्यवेक्षक उपस्थित होते.

satyajeet tambe win
सत्यजित तांबे ६८ हजार ९९९ मतांनी विजयी

पहिल्या पसंतीचे मते: वैध ठरलेल्या मतांपैकी एकूण १५ उमेदवारांना प्राप्त पहिल्या पसंतीचे मते पुढील प्रमाणे शुभांगी भास्कर पाटील 39534, रतन कचरु बनसोडे 2645, सुरेश भिमराव पवार 920, अनिल शांताराम तेजा 96, अन्सारी रईस अहमदअब्दुल कादीर 246, अविनाश महादू माळी 1845, इरफान मो इसहाक 75, ईश्वर उखा पाटील 222, बाळासाहेब रामनाथ घोरपडे 710, ॲड. जुबेर नासिर शेख 366, ॲड.सुभाष राजाराम जंगले 271, नितीन नारायण सरोदे 267, पोपट सिताराम बनकर 84, सुभाष निवृत्ती चिंधे 151, संजय एकनाथ माळी 187.

शुभांगी पाटील यांचा पराभव: नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून अखेर अपेक्षेप्रमाणे अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांनी बाजी मारत निवडणूक जिंकली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला आहे. त्या पहिल्या फेरीपासूनच सत्यजित तांबे यांच्यापेक्षा मतांनी पिछाडीवर होत्या. प्रत्येक फेरीअंती दोघांमधील तफावत आणखी वाढतच होती. सत्यजीत तांबे यांनी पहिल्या पसंतीची ६८९९९ इतकी मते मिळवली. तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मते पडली. पुन्हा एकदा नाशिक पदवीधर मतदारसंघात तांबे कुटुबियांचे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

हेही वाचा: Nashik Graduate Constituency Election नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूकीसाठी मतदान सुरू सत्यजीत तांबेशुभांगी पाटील यांच्यात लढत

Last Updated : Feb 3, 2023, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.