नाशिक : Samruddhi Mahamarg Accident : बुलढाणा येथून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा समृद्धी महामार्गावरती अपघात झाला. या अपघातात नाशिकच्या समता नगरमधील एका पाच वर्षीय मुलीचा आणि तिच्या आईचा मृत्यू (Mother And Daughter Death) झालाय. ही घटना समजल्यानंतर संपूर्ण समता नगर हळहळले. या दुर्दैवी घटनेमुळे कशातच मन लागत नसून, सकाळपासून घरात चूल देखील पेटलेली नसल्याचं परिसरातील महिलांनी सांगितलं.
माय-लेकींचा अपघातात मृत्यू : रविवारी पहाटेच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळ भीषण अपघात (Accident News) झाला. अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. हे मृत प्रवासी नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली. मृतांमध्ये नाशिक शहरातील समता नगर येथील काजल लखन सोळसे आणि पाच वर्षीय तनुश्री लखन सोळसे यांचा समावेश आहे. माय-लेकींचा या अपघातात मृत्यू झाल्यानं सोळसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तनुश्री या चिमुकलीचे वडील लखन, बहीण धनश्री आणि भाऊ कार्तिक असे तीन जण देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विट करुन अपघातावर शोक व्यक्त केलाय. मृतांच्या वारसांना पंतप्रधान फंडातून दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलंय. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. तसेच या अपघाताच्या चौकशीचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
हेही वाचा -
- Samruddhi Mahamarg Accident : 'समृद्धी'वर कसा झाला अपघात? बचावलेल्या बालकानं दिली धक्कादायक माहिती
- Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर १२ जणांचा मृत्यू, पंतप्रधान कार्यालयाकडून मृताच्या नातेवाईकांना मदत जाहीर
- Samruddhi Mahamarg Accident : अपघातातील मृतांच्या वारसांना केंद्रासह राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर, राजकीय नेत्यांच्या वाचा प्रतिक्रिया