सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मला सारखेच; विधानसभा अध्यक्ष नाना पटोले - नाना पटोले मनमाड न्यूज
विधानसभेत होणाऱ्या गोंधळामुळे जनतेचे प्रश्न मागे पडतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील लोक मला नवीन नाहीत. सर्वांचे स्वभाव मला माहित आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना हाताळून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल हाच प्रयत्न राहील, असे नाना पटोले यांनी सांगितले.
नाशिक - विधानसभेचा अध्यक्ष असल्याने सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मला सारखेच आहेत. मी ज्या पदावर आहे त्या पदामुळे, कुणाची खदखद असेल तर ती विधानसभेतच मिटवता येईल. एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे मत विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी ते मनमाड येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
विधानसभेत होणाऱ्या गोंधळामुळे जनतेचे प्रश्न मागे पडतात. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील लोक मला नवीन नाहीत. सर्वांचे स्वभाव मला माहित आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना हाताळून जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल हाच प्रयत्न राहील, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा - आता धान उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे मिळणार ५०० रुपये
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रुपाने जनतेला बऱ्याच वर्षांनी चांगला आणि संवेदनशील मुख्यमंत्री मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना नक्की न्याय मिळेल. थोडे लेट पण थेट आलेले हे महाविकासआघाडीचे सरकार संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल. चांगली कामे पुर्ण करण्यासाठी विरोधी पक्ष देखील साथ देईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
आमदार सुहास कांदे, माजी आमदार अनिल आहेर, मनमाड शहर काँग्रेसचे अध्यक्ष अफजल शेख, नगरसेवक संजय निकम, संतोष आहिरे, तहसीलदार मनोज देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. जी. खैरनार, ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशनचे सतिष केदारे हे यावेळी उपस्थित होते.