नाशिक - मालेगाव तालुक्यातील सायने शिवारात एकाचा खून झाल्याची घटना घडली. गोरख नामदेव जाधव (वय 50 रा.गिगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मालेगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या चार तासात तिघा संशयितांना अटक केली आहे. मालेगावमधील सायने शिवारातील आर. आर. जाजु कंम्पाउंड परिसरात शनिवारी रात्री ही घटना घडली.
हेही वाचा - देव तारी त्याला... सहा तास हृदयक्रिया थांबल्यानंतरही महिला जिवंत
गुन्हे शाखेने केलेल्या तपासात शेहबाज अंजुम मेहमूद (वय 20 रा, हकीम नगर, मालेगाव), नूर अमीन नियाज अहेमद (वय 22), मोहम्मद युसूफ मोहम्मद उर्फ यसुफ भुन्या (वय 23, रा. पवारवाडी) या तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना अटक केली. आरोपींनी जाधव यांचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जाधव यांनी तीव्र प्रतिकार केल्याने संतापात केलेल्या हल्ल्यात जाधव यांचा मृत्यू झाल्याची कबुली चोरट्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा - 'आरोपींचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश, कायदे कडक करण्याची गरज'
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी शहराच्या मध्यवर्ती भागातील अहिल्याबाई होळकर पुलाजवळील रस्त्यावर वायरमनवर अशाच प्रकारे गळ्यावर धारदार हत्याराने वार करून प्राणघातक हल्ला केला होता. वेळीच उपचार झाल्याने जखमीचा जीव वाचला होता. यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला होता. अटक केलेल्या आपरोपींचा या घटनेशी संबंध आहे का, हे पोलीस तपासत आहेत.