येवला (नाशिक) - शहरासह तालुक्यात वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाचे लिलाव हे तीन दिवस बंद राहणार असून या दरम्यान कांदा ,मका, भुसार हे लिलाव बंद राहणार आहे. 29 एप्रिल ते 1 मे या दरम्यान बाजार समिती मधील सर्व लिलाव बंद असल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
1 मेपर्यत सर्व लिलाव बंद
ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी उत्पन्न बाजार समित्या काही दिवस बंद ठेवण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आढावा बैठकीत दिला होता. त्यानुसार 29 एप्रिल ते 1 मेपर्यंत बाजार समितीमधील सर्व प्रकारचे लिलाव हे बंद ठेवण्यात येणार असून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीसह अंदरसूल येथील उपबाजार समितीतील लिलावही बंद राहणार आहे.
'शेतकऱ्यांनी सहकार्य करावे'
कांदा ,मका ,भुसार धान्य लिलाव बंद राहणार असून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे,असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी केले आहे.