महाराष्ट्र - धरणांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणी संकट निर्माण झाले आहे. नाशिक जिल्हा म्हणजे गोदावरीचे उगमस्थान. जिह्यात जवळपास 24 धरणे आहेत. मात्र असे असतानाही येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जिल्ह्यातील एक गाव तर असे आहे की ज्या ठिकाणी नागरिक पाणी मिळत नाही म्हणून गाव सोडून शहराकडे स्थलांतर करत आहेत. तर गावात पाणी नसल्यामुळे इतर गावातील नागरिक आपल्या मुलींचे लग्न या गावातील मुलांशी लावत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया येथील रहिवाश्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
पाण्यासाठी भटकंती - नाशिक जिल्ह्यात जवळपास छोटीमोठी 24 धरणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूर मधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तरी देखील काही तालुक्यात भीषण उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत आहे. अक्षरशः महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करावी लागत आहे.
प्रशासनाने मदत करण्याचे आवाहन - जिह्यात गेल्या काही दिवसापासून विहिरींनी तळ गाठला असल्याने अक्षरशा नागरिकांना फक्त पाण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागत आहे. पिण्याच्या पाण्याकरता गावात हातपंपावर फक्त हंडाभर पाणी मिळत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली. मात्र गावे ही वस्तीवर राहत असल्याने टॅंकरही खूप महाग पाणी पुरवठा करत आहेत. याकडे मात्र प्रशासन सर्रास दुर्लक्ष करताना दिसत आहे.
पोलीस पाटील म्हणतात - नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील हिरीडपाडा बोरगाव गावात भीषण पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. हिरडपाडा गावातील रहिवाशांना तीव्र पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. गावात पाण्याची समस्या असल्याने बाहेरूनत्यामुळे गावातील मुलांना कोणी मुलगी देत नाही आहे. गावातील नागरिक हे गाव सोडून इतरत्र पाण्याच्या ठिकाणी जात आहेत, असे गावचे पोलीस पाटलांनी सांगितले.
गावात सोईसुविधा मात्र पाणी नाही - पिण्याच्या पाण्यासाठी खूप खूप हाल आहेत. सकाळ पासून पाण्यासाठी विहिरीवर उभे राहावे लागत आहे. पाणी काढण्यासाठी विहिरीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पाण्यासाठी गावात सोईसुविधा आहेत. मात्र गावातील विहिरीला पाणी नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे खूप हाल होत आहेत. असे एका रहिवाश्यांने सांगितले.
गावातील मुलांना मुली देत नाहीत - बाहेर गावातील लग्नाची स्थळे आल्यावर पाणी नाही म्हणून गावातील मुलांना कोणी मुलगी देत नाही आहे. यावर येथील जनाबाई गवळी यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'पाण्यामुले तेनं मय लग्न ठरतं नाही, मारे पेरगं बांडग्न होई', रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत पाण्यासाठी झोपता येत नाही आहे. गावात पाणी मिळत नसल्यामुळे नागरिक गाव सोडून जात आहे.
हेही वाचा - Maharashtra Water Scarcity : नाशिकच्या येवला तालुक्यात 7 टँकरद्वारे भागवली जाते आहे १५ गावांची तहान
हेही वाचा - Yeola Water Scarcity : येवल्यात पाणीटंचाई, टँकरची मागणीत प्रचंड मागणी
हेही वाचा - Watermelon Grower Success Story : शेतकरी महिलेने टरबुज पिकात घेतले लाखोंचे उत्पन्न, पाहा व्हिडिओ