ETV Bharat / state

पदभार स्वीकारताच नाशिकच्या पोलीस अधीक्षकांचे धाडसत्र; सुरगाणा तालुक्यात अवैध धंद्यांवर छापे - police

या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेतले असून जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारी २ हजार  लीटर रसायने नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उंबरठाण येथील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून ६ गाड्यांसह १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नाशिक
author img

By

Published : Mar 12, 2019, 11:42 AM IST

नाशिक - आरती सिंह यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर धाडसत्र सुरू केले आहे. पोलिसांनी गेल्या २ दिवसात सुरगाणा तालुक्याच्या बोरगाव आणि उंबरठाण परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या १३ ठिकाणी गावठी दारूभट्टी तसेच जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे.

या कारवाईत ६ जणांना ताब्यात घेतले असून जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारी २ हजार लीटर रसायने नष्ट करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. उंबरठाण येथील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करून ६ गाड्यांसह १ लाख ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे बोरगाव परिसरात नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू काढली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रविवारी बोरगावपासून चिखलीपर्यंतच्या संपूर्ण नदीपात्राची पायी गस्त करून पाहणी केली.

याठिकाणी २ हजार लिटरपर्यंत दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन व त्यासाठी लागणारे साहित्य नष्ट करण्यात आले. या गावठी दारूची अंदाजे किंमत ७० हजार रुपये आहे. गावठी दारू जप्त करून ती नष्ट करण्यात आली. यावेळी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे यांनी सुरगाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे चालणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Intro:नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदाचा आरती सिंह यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावर त्यांनी धाडसत्र सुरूच केले मागील दोन दिवसात सुरगाणा तालुक्याच्या बोरगाव आणि उंबरठाण परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या एकूण 13 ठिकाणी गावठी दारू भट्टी तसेच जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले जवळपास अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला या कारवाईत गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारी 2000 लिटर रसायन नष्ट करण्यात आले असून या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे

Body:ह्या कारवाई अवैद्य दारू व जुगार अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्या ऊबरठाण येथील जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करू सहा गाड्या 6 ईसम असा एकूण 1 लाख 75 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीआहे त्याचप्रमाणे प्रमाणे बोरगाव परिसरात नदीपात्रात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू काढले जात असल्याबाबत आम्हाला माहिती आम्ही दिनांक 10:03 :2019 रोजी बोरगाव पासून चिखली पर्यंतच्या संपूर्ण नदीपात्राची पायी गस्त करून पाहणी करून सदर ठिकाणी जवळ जवळ आम्ही दोन हजार लिटरपर्यंत दारू तयार करण्यासाठीचे कच्चे रसायन व त्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले आहे

Conclusion:सदर गावठी दारू ही अंदाजे 70 हजार रुपये एवढे किमतीची गावठी दारू नष्ट करण्यात आली सुरगाणा पोलिस ठाण्यातील इथून पुढे अवैध धंदे हे चालणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक दिनेश भदाणे सागीतले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.