नाशिक - कोरोनाशी दोन हात करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ले होण्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी शहरातील रुग्णालयांबाहेर 'क्यूआर' कोड लावले असून, प्रत्येक तासाला पोलिसांचे पथक रुग्णालयांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. राज्यातला हा पहिलाच प्रयोग असल्याने पोलिसांचा हा प्रयोग यशस्वी होईल, अशी खात्री डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
क्यूआर कोड व्यतिरिक्त शहरातील मोठ्या रुग्णालयांना कोरोनाबाबतचे माहिती फलक, तसेच डॉक्टरांवर हल्ला केल्यास कायद्यातील तरतुदी याबाबतचे फलक लावण्यास पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचा उपयोग पूर्वी शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी केला जात होता. आता मात्र रुग्णालयांमध्ये होणारे वाद आणि त्यानंतर होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांचे प्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी क्यूआर कोडचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, या निर्णयाचे शहरातील डॉक्टरांनी स्वागत केला आहे.
हेही वाचा- 5000 बेडच्या रुग्णालयासाठी फक्त एक निविदा; पालिकेकडून 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ