नाशिक - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील अनेक नागरिक विनाकारण घरा बाहेर पडत आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. तसेच त्यांना भर रस्त्यात उठबशा काढण्याची शिक्षा दिली जात आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहे. जीवनावश्यक वस्तूची दुकाने वगळता सर्व आस्थापना बंद असून नागरिकांनी वैद्यकीय कामा व्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहे. मात्र, तरी देखील नियमांचे उल्लंघन करत घराबाहेर पडताना दिसत आहे. या परिस्थितीत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. भद्रकाली परिसरत पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना भर रस्त्यात उठाबशा काढण्याची शिक्षा करण्यात आली. तर काही ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना दंडुक्याचा प्रसादही दिला.
हेही वाचा - राजीव सातव यांच्या मृत्यूची उच्चस्तरिय चौकशी करा; नांदेड जिल्ह्यातून राष्ट्रपतींकडे मागणी
नाशिक शहरातील 13 पोलीस ठाणे अंतर्गत ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची विचारपूस केली जात आहे. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड देखील आकाराला जात आहे.
लाखो रुपयांचा दंड वसूल -
नाशिकमध्ये करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या 10 दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी नागरिक निर्धास्त झाल्याचे दिसत असून विना मास्क रस्त्यावर फिरत आहेत. अशा नागरिकांवर नाशिक पोलीस आणि महानगर कडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असून आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पीपीई किटमधील घामापासून सुटका; पुण्याच्या निहालचे कोव्ह-टेक व्हेटिलेशन ठरतेय प्रभावी