नाशिक - कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जनता कर्फ्यू दरम्यान नागरिक कडेकोट बंदोबस्त पाळत आहेत. मनमाड जंक्शनसह आठवडे बाजार आणि संपूर्ण शहर जनता कर्फ्यूनिमित्त बंद आहे.
मनमाड हे रेल्वेचे मोठे जंक्शन आहे. येथून दिवसभर जवळपास १५० प्रवाशी प्रवास करतात. मात्र, जनता कर्फ्यूनिमित्त रेल्वेस्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळाला. रविवारचा आठवडे बाजारही रद्द करण्यात आला आहे. तर, शहरातील संपूर्ण दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत.
हेही वाचा -'जनता कर्फ्यू'ला मुंबईकरांचा प्रतिसाद, 'सीएसएमटी' स्थानकावर सुरक्षा व्यवस्था कडक
मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर यांनी पोलिसांच्या मदतीने कालपासूनच संपूर्ण शहरात आवाहन करत रविवारी दुकाने बंद करण्यासाठी सांगितले. त्याचाही मोठा फायदा झाला आहे. तर, मनमाड शहरातून जाणारा इंदूर पुणे महामार्ग देखील आज पूर्णपणे रिकामा होता. तर, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील आज बंद ठेवण्यात आली. एकंदर कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.
हेही वाचा -In Pictures : 'जनता कर्फ्यू'ला चांगला प्रतिसाद; देशभरातील रस्त्यांवर शुकशुकाट!