नाशिक : नाशिकरोड पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक गणपत महादू काकड, (५७, रा कृष्ण अपारर्टमेंट, गजपंथ अपार्टमेंट, दिंडोरी रोड म्हसरूळ) याला विनयभंगाच्या गुन्ह्यातील संशयिताकडून लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कायद्याचा रक्षक असलेल्या पोलिस उपनिरीक्षकानेच विनयभंगातील गुन्ह्यात संशयिताला मदतीसाठी लाच स्वीकारल्याने, अशा गुन्ह्यांतील पिडित महिलांनी कोणावर विश्वास ठेवायचा अन् कोणाकडे मदत मागायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
२५ हजाराची मागणी केली होती : एका पति, पत्नी परस्पर विरोधी तक्रार होती म्हणून, नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील फिर्यादीने विनयभंगाचा आरोप केला होता. त्या गुन्ह्यातील तपासादरम्यान आरोपीताला मदत करण्यासाठी गणपत काकड याने त्याच्याकडे बुधवारी (दि.५) २५ हजाराची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती १५ हजारांची रक्कम देण्याचे ठरले. मात्र या गुन्ह्यातील आरोपीने त्याला खोट्या गुन्ह्यात गोवले जात असून अशा प्रकारातही त्याच्याकडून १५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
१५ हजाराची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले : त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या पथकाने या प्रकाराची खात्री केली. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या आवारात सापळा पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार, तक्रारदाराकडून १५ हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वातील पोलिस हवालदार बाविस्कर, पोलिस नाईक प्रकाश महाजन, ज्योती शार्दूल यांच्या पथकाने गणपत काकड याला रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, या प्रकरणात एका पोलिस हवालदरानेही काकड यांची मदत केली असून त्यालाही अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणात रात्री उशीरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
लाच स्वीकारताना अटक : प्रविण काकड म्हसरूळ परिसरातील सराईत गुन्हेगार होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना अटक केलेल्या पोलिस निरीक्षक गणपत काकड याचा इतिहास आणि वर्तमानही वादग्रस्त आहे. त्याचा मुलगा प्रविण काकड हा म्हसरूळ परिसरातील सराईत गुन्हेगार होता. याच गुन्हेगारी पार्श्वभूमीतून त्याची तीन वर्षापूर्वी हत्या झाली होती.
हेही वाचा -