नाशिक : जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास असल्यास अशक्य गोष्ट शक्य होते. हाच अनुभव पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील पोलीस उपनिरीक्षक अभिजित काळे यांना आला आहे. पदवीधर झाल्यानंतर अभिजित यांनी 2017 मध्ये पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षेची पूर्व आणि मुख्य परीक्षेत यश संपादन केले होते. मात्र वजन 98 किलो असल्याने त्याला मैदान चाचणीसाठी मुकावे लागले होते. मात्र पीएसआय होऊन देशसेवा करण्याची जिद्द मनात असल्याने त्याने पुन्हा एकदा आपले नशीब आजमावत 2019 मध्ये मुख्य परीक्षेत बाजी मारली.
रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मान : 2020 मध्ये कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे आणि मराठा आरक्षणाच्या वादामुळे मैदान चाचणी रखडली होती. याच गोष्टीचा फायदा घेत अभिजित यांनी डायट प्लॅन फॉलो करत आपले वजन 30 किलोने घटवले. ज्या मैदानावरून त्यांना वजनामुळे माघारी फिरावे लागले होते. त्याच मैदानावर 100 पैकी 100 गुण मिळवत त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले. विशेष म्हणजे 494 पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षणार्थीमध्ये मानाचा समजला जाणारा रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचा मानही त्यांना मिळला.
असा आहे रंजक प्रवास : ग्रॅज्युएशन झाल्यानंतर फर्स्ट ॲटममध्येच अभिजित यांनी पीएसआयची प्रीलियम आणि मेन्स क्रॅक केली होती. पण वजन खूप असल्यामुळे अभिजित यांना ग्राउंड क्रॅक करता आले नाही. पण त्यांनी प्रयत्न चालू ठेवला आणि 2019 मध्ये पुन्हा पूर्व आणि मुख्य परीक्षा पास केली. मात्र कोरोना आणि मराठा आरक्षणाचा वाद यामुळे मैदान चाचणी राहून गेली होती. मात्र 2017 मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवले याचा आनंद असल्याचे अभिजीत काळे यांनी सांगितले.
अभिजितचे वजन 98 किलो होते : अभिजित यांचे वजन 98 किलो होते. पीएसआय होण्यासाठी 30 किलो वजन कमी करून त्यांनी 68 किलो पर्यंत केले. मित्र शैलेश दरेकर यांच्याकडून डायट प्लॅन घेतला. मॉर्निंगला ग्राऊंड आणि जिम असा दिनक्रम करून वेटलॉस करून स्टॅमिना वाढला. 1 ऑगस्ट 2022 अभिजित यांची ट्रेनिंग चालू झाले आणि 5 जुलैला पासिंग आउट परेड झाली. यात अभिजित यांना सर्वात मानाचा रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर हा पुरस्कार मिळाला आहे.
हेही वाचा -
- Shiv Chhatrapati Sports Award: अपंगत्वावर मात करून 'हा' ब्लेड रनर ठरला शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी
- Srishti Jagtap World Record: लातूरच्या 'सृष्टी'ने देशाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा, सलग १२७ तास नृत्याचा विश्वविक्रम
- Water Yoga : पठ्ठ्याचा नादच खुळा; तासाभरात पाण्यावर केले 50 योगासन, पोलिसाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद